शेतकऱ्यांनच जगणं

शेतकऱ्यांनच जगणं हे सद्यपरिस्थितीत खूपच बिकट झाले आहे.मागील चार ते पाच सालापासून पासून त्याला अनेक संकटाना समोर जावं लागत आहे.यामध्ये अनेक दुष्काळ पडले त्यांच्या वर भयंकर असे संकट आले.2017 साली पडले ला दुष्काळ हा मराठवाड्यातील भयंकर दुष्काळ मनायाला ही हरकत नाही पुर्वी 1972 साली देखील खुप मोठा दुष्काळ पडला होता.

त्या वेळी धान्य नव्हतं पण पाणी मात्र सगळी कड़े होतं मात्र 2017साली पडलेल्या दुष्काळात धान्य होतं पण पाणी टंचाई सर्वत्र होती .2018_19चे साल बरे राहिले पण जेंव्हा शेतकऱ्यांच्या मालाची काढनी वेचनी ची वेळ आली तेंव्हा मात्र पावसाने खूपच पडुन सारा नासोडा केला अनेक शेतकऱ्यांचे खराब कापूस , सोयाबीन आज देखील तसेच आहेत , योग्य भाव भेटण्याच्या प्रतीक्षेत ते रखडले गेलेत .

हे सर्व सुरू असतांना या साली सुरवातीपासूनच , महामारी चे संकट येऊन शेतकऱ्यांनवर याचा खूप मोठ्या प्रमाणात भटका बसला , देशात सर्वत्र या रोगाचे महाजाल झाले असतांना शेतकऱ्यांना अतोनात लुट चालू झाली .पेरणी वेळी कंपनी ने सोयाबीन चे बोगस बियाणं काढून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकलं त्याला पाऊस चांगला असतांना देखील बी न उगवल्या मुळे मराठवाड्यास महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली .

शेतकरी हा सर्व बाजूने घेरला गेला त्यांच्या मालाला या रोगाचे निमित्त सांगून व्यापाऱ्यांनी अल्पभाव घेतले .मात्र जेंव्हा त्यांच्या खताचा व औषधाचा
भाव दरवर्षी प्रमाना पेक्षा या वेळी जास्त आकारण्यात आला .कोरोना रोगा मुळे अनेक शेतकऱ्यांना लागणाऱ्या लहान ते मोठ्या पर्यंत वस्तूचा भाव हा ज्या त्या दुकानदारा कुन लावण्यात आला लॉकडाऊन मुळे पूरवठा कमी आहे.सांगून शेतकऱ्यांची अतोनात आर्थिक लुट करण्यात आली .

खरं तर ही महामारी शेतकऱ्यांना साठी शापच ठरली आहे.यामध्ये शेतकरी चोहीकुण आर्थिक कोंडीत सापडला आहे.ज्याला जस लूटता येईल , तो तश्या प्रमाणात शेतकऱ्यांना लुटण्याचा पर्यन्त करीत आहे.

मागील अनेक वर्षा पासून निसर्गाची योग्य साथ नसल्यामुळे शेतकऱ्यांच जगणं विस्कळीत झालं आहे.मुलांना शिकवण्या चा खर्च तर काय त्याला स्वतःचा व कुटुंबाचा उदर निर्वाह करण्यात इतका देखील तो सक्षम राहीला नाही .कोरडवाहू शेतकऱ्यांच तर त्या पेक्षा ही बिकट आवस्थेत जीवन जगणं चालू आहे.त्यांना दर वर्षी निसर्ग फटका दिल्याशिवाय राहत नाही , कधी दुष्काळाचे घाव , तर कधी अवकाळी पावसाने नुसकान

खरं सांगायच म्हटलं तर शेतकऱ्यांच्या आयुष्यात नेहमी दुःखच आलं , कधी निसर्गानं दिलं तर कधी मानवाने दिलं .निसर्गाला आपन काही करू शकत नाहीत .पण मानवाने जर ठरवलं तरी देखील आपला पोशिंदा .बळीराजा आनंदात जगेल .अरे जो आपल्याला जगवतो , आपन त्याला जगंवलच पाहिजे , त्यांच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य आपन काढण्यासाठी हातभार केला पाहिजे .

शेतकरी तुम्हांला कधीच आयते पैसे मागत नाही , त्यांच्या कष्टाला अता मोल द्यायलाच पाहिजे त्यांनी राब राब राबवून उन्हां तान्हात घाम गाळून जे मातीतून पिकवल ते अता आपन योग्य भावात घेणं ही काळची गरज आहे .

व्यापारी, दुकानदार , यांनी ही त्यांना शेती साठी लागनाऱ्या वस्तु ह्या शासनाने ठरवले ल्या भावा प्रमानेच दिल्या पाहिजेत आपन येवढ जरी केलं , तर शेतकऱ्यांना कधीच वाईट वेळेतून प्रवास करावा लागणार नाही , खरच प्रत्येकाने नित्यं , सत्य , आणि नियमानुसार वागले तर आज कोरोना च्या या महामारीत देखील आपला शेतकरी टिकून राहील व त्याला त्याला टिकण्याचे काम देखील आपल्याला करायचे आहे .एक लक्षात ठेवा तो या संकटात टिकला तरच आपन आहोत .नाही तर आपन ही नाहीत .

अंगद दराडे
माजलगाव, बीड 

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन अध्यक्षपदी केसरकर,पिंपरी चिंचवडचे स्वानंद राजपाठक सचिव

article
Comments (1)
Add Comment