- तालुका भाजपाचे तहसीलसमोर धरणे
माजलगांव ,प्रतिनिधी:-शासनाने जाहीर केली शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करून खरीपच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना त्वरित कर्ज पुरवठा करावा या मागणीसाठी तालुका भाजपाच्या वतीने सोमवार दि .२२ रोजी माजलगांव तहसील समोर धरणे आंदोलन करण्यात आले . यावेळी भाजपाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .
राज्य सरकारच्या बांधावर खत आणि बियाणे या योजनेचा बोजवारा उडाला आहे.पीक कर्जाचे ठप्प झाले आहे.त्यामुळे भाजपाने राज्यभर आंदोलनाचा निर्णय घेतला आहे . त्या अनुषंगाने तालुका भाजपाच्या वतीने सोमवार दि . २२ रोजी सकाळी ११ वाजता तहसील समोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.कोरोना महामारीच्या संकटकाळात शेतकरी हवालदिल झाला असून पेरण्यासाठी तो सावकाराचे दारे झिजवत आहे .
खरिपासाठी त्याला त्वरित कर्ज पुरवठा होणे आवश्यक आहे.या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी सामाजिक अंतर ठेवत तात्काळ कर्ज उभारणी करावी , शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून कर्जमाफीच्या अंमलबजावणी जाहीर करावी अशी मागणी लावून धरण्यात आली .
यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष अरुण राऊत , डॉ.अशोक तिडके ज्ञानेश्वर मेंडके , बबनराव सोळंके , लतीफ नाईक , हनुमान कदम , मनोज जगताप , ईश्वर होके , विनायक रत्नपारखी , माणिक दळवी , दत्ता महाजन , मनोज फरके पवन मोगरेकर , विजय रांजवन , नामदेव मुळे , इत्यादी सह भाजपाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .
चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार सध्या जैसे थे…
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});