सोयाबीन उगवले नसल्याच्या दोनशे शेतकऱ्यांच्या तक्रारी, केवळ पंचनामेच; भरपाई मिळणार कधी?
माजलगांव, प्रतिनिधी – मृग नक्षत्रात पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांनी महागामोलाचे बियाणे खरेदी करून सोयाबीनची पेरणी केली . परंतु अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाही . हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे तक्रारी केल्या . पंधरा दिवसांपासून अधिकाऱ्यांचा पंचनाम्याचा फार्सही सुरुच आहे ; परंतु भरपाई कधी मिळणार ? आता दुबार पेरणी तरी करायची कशी ? असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे .
कधी निसर्ग तर , कथी शासन व्यवस्थेच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी बियाणे कंपनीने पण सोडले नाही . वर्षभर काबाडकष्ट करून शेवटी पदरात पडणाऱ्या शेतमालाच्या भरवशावर कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या शेतकऱ्यांच्या माथी निकृष्ट बियाणे मारून बियाण्याच्या कंपन्यांनी पोळी भाजून घेतली आहे .यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम सुरु झाला तरी बँकांकडून शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करण्यात आले नाही . यंदा पहिल्यांदाच मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला आहे .
यामुळे अनेकांनी खासगी सावकारांचे पैसे घेऊन तर , कुणी जवळचे किडूक – मिडूक ( दागिने ) मोडून महागामोलाचं बियाणे , खते खरेदी करून सोयाबीनची पेरणी केली ; परंतु अनेक शेतकऱ्यांचे पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने तालुक्यातील १८० शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत . तक्रारीवरून कृषी अधिकाऱ्यांनी आठ दिवसांपासून शेतात जाऊन पंचनामे करायला सुरु वात केली आहे . बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेला पाठवून वरिष्ठांना अहवाल पाठविणार असल्याचे सांगण्यात येते .
यापुढेही शासनाचे कागदी घोडे नाचतील ; परंतु शेतकऱ्यांना भरपाई मिळणार तरी कधी ? पेरणीचा हंगाम निघून चालला असताना आता दुबार पेरणी करायची तरी कशी ? त्यासाठी पैसे आणायचे कोठून ? शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अशा एका ना अनेक प्रश्नांची उत्तरे शासन कधी देणार याकडे बळीराजाचं लक्ष लागलं आहे . सोयाबीनमुळे मात्र शेतकरी त्रस्त झाल्याचे चित्र तालुक्यात आहे .
किमान तात्काळ बियाणे तरी द्या
• सोयाबीन हे तीन मिहन्याचे पिक असल्याने शेतकरी त्यावर पुन्हा हरभरा , ज्वारी यासारखे पिक घेतो . सोयाबीनची लवकर पेरणी झाल्यास रबीचे पीकही चांगले येते . यामुळे पेरणीचा हंगाम संपण्याआधी किमान बियाणे तरी बदलून द्या , अशी प्रतिक्रिया नारायण सोळंके या शेतकऱ्यांने दिली आहे .
सोयाबीन उगवले नसल्याच्या आतापर्यंत २०० शेतकन्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत . प्रत्येक तक्रारदार शेतकयांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्यात येत आहेत . काही नमुने प्रयोगशाळेला पाठवले असून लवकरच वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात येणार आहे .
-शिवप्रसाद संगेकर , तालुका कृषी अधिकारी.
READ MORE – सावधान… मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळा, नागरिकांसाठी सरकारचे अलर्ट
READ THIS – प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?