शेतात पाण्याचा पाईप का टाकला विचारले व डोके फोडले

माजलगांव/(प्रतिनिधी):- तालुक्यातील लोणगाव कॅम्प येथे किरकोळ कारणावरून एकाला दोघांनी शीवीगाळ करून केलेल्या मारहाणीत डोक फोडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याबाबत माहिती अशी की, उपरोक्त नमूद गावाच्या ठिकाणी राहत असलेले व भावकीतीलच नितीन हनुमान सोनकांबळे आणि बालासाहेब मारोती सोनकांबळे ,गयाबाई मारोती सोनकांबळे यांच्यात किरकोळ कारणाने भांडण होऊन गयाबाई सोनकांबळे नी शीवीगाळ केली तर नितीन सोनकांबळे चे डोक बालासाहेब सोनकांबळे ने विटाने केलेल्या माऱ्यात फुटुन गंभीर जखम झाली.
याची फिर्याद नितीन ने दिंद्रुड पो.ठाण्यात २४एप्रिल शुक्रवार रोजी दिली आहे. यात म्हटले आहे की, २३एप्रिल गुरुवार रोजीच्या सायंकाळी ६:३०वा.सुमारास त्यांच्या घरासमोरच त्यांनी सदर व्यक्तींनी फिर्यादी व वडिलांच्या शेतात पाण्याचा पाईप का अंथरला.असे विचारले असता त्यांनी नमूद कृत्य केले असे
२४/०४च्या फिर्यादी नुसार गुरनं-८३/२०२० वरुन दोन्ही आरोपी विरोधात भादंवि. ३२४, ५०६.कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.ना.मस्के करत आहेत.

Comments (0)
Add Comment