शेतात बांधल्या रेशीमगाठी…

बेघरांना मदतीद्वारे गृहप्रवेश, परभणीच्या युवकाचा आगळा- वेगळा सोहळा
परभणी, प्रतिनिधी – सहा महिन्यांपुर्वी ठरलेले लग्न लॉकडाऊनमुळे दोन वेळा लांबणीवर पडले. मात्र घरातील वडिलधारांचा विचार करून त्या युवकाने संपूर्ण प्रशासकीय सोपस्कारानंतर अवघ्या सात व-हाडींच्या साक्षीने शेतात रेशीमगाठी बांधल्या.पून्हा सोपस्कार पूर्ण करीत बेघरांना अन्नधान्य व मास्कचे वाटप करीतच नववधू सोबत सोमवारी(दि.4) गृहप्रवेश केला.
परभणीतील शंकरनगर भागातील किरण प्रकाश सपाटे या नववराचा विवाह सोमवारी मुदखेड(जि.नांदेड) तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील शितल कचरू केळकर हिच्याशी आगळ्या-वेगळ्या वातावरणात पार पडला. नववर-वधूनी अनेक तांत्रीक व प्रशासकीय अडचणीचे सोपस्कार पार पाडीत जणू अग्नीदिव्यच पूर्ण केल्याचे दिसून आले.
सहा महिन्यांपूर्वी किरणचा विवाह शितलशी ठरला होता. यापुर्वी सहा एप्रिल ही विवाहाची तारीख निश्‍चीत झाली होती. त्यानंतरही एक ताऱीख निश्‍चीत करण्यात आली. परंतूू लॉकडाऊन वाढतच गेले आणि या विवाह सोहळ्याता मुहुर्त गाठता येईनासा झाला. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीचा विचार करून किरण सातत्याने विवाहच्या दृष्टीने विचारात होता. त्याचा मित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचा जिल्हा सरचिटणीस कृष्णा कटारे याच्याशी त्याने या संदर्भात चर्चा केल्यानंतर दोन मे रोजी ऑनलाईन अर्ज प्रशासनाकडे दाखल केला. मात्र जिल्हा प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारली.
दरम्यान, प्रशासनाकडे सर्व प्रकारची कबुली देत किरणसह सोबत जाणारे कृष्णा कटारे व कुणाल गायकवाड या तिघांनीही स्वतःची कोरोना टेस्ट केली. तिकडे मुलगी शितलचीही कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचे अहवाल आल्यानंतर प्रशासनाने दिलेल्या परवानगी नुसार अगदीच पोलिस पाटील, सरपंच, मुलीचे आई,वडील व मुलाच्या दोन मित्रांसह हा सोहळा रोहीपिंपगळगाव येथील शेतात नियमांचे काटेकोरपालन करीत पार पडला.

दातृत्व पार पाडीत केला गृहप्रवेश
नववर-वधूनी लग्न सोहळा आटपल्यानंतर परभणीत पुन्हा एकदा स्वतःची वैद्यकीय तपासणी केली. महापालिकेच्या बेघर निवारात असलेल्यांना मास्कचे वाटप केले. 11 गरजू कुटुंबांना धान्याच्या किटचे वाटप करीत गृहप्रवेश केला.

Comments (0)
Add Comment