श्री शिवाजी महाविद्यालयाने राबवली कोरोना जनजागृती मोहीम

परभणी – जगभर कोरोनाचा उद्रेक होत असताना खेड्यातील नागरिकांचे मानसिक व सामाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी मदत व्हावी व कोरोना विषयी समज- गैरसमज दूर व्हावीत म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने तालुक्यातील हिंगला व वाडी दमई येथे जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
महाविद्यालयाच्या उन्नत भारत अभियान विभागांतर्गत दत्तक गांव हिंगला व वाडी दमई येथे कोविड-१९ संसर्गजन्य रोगाच्या बाबतीत घ्यावयाची काळजी, सोशल डिस्टेंस,वेळोवेळी साबुन, हैंडवाशने हाताची स्वच्छता, नियमित मास्कचा वापर, सॅनिटायज़रचा वापर कसा करायचा, मास्कची स्वच्छता कशी करायची आणि आहाराबाबतची इतंभूत माहिती सोशल डिस्टँसिंग पाळत उन्नत भारत अभियानाचे समन्वयक प्रा. प्रल्हाद भोपे यांनी दिली. गावामधे नवीन व्यक्तींना प्रवेश देताना त्यास शासकीय रुग्णालयातून स्वतः तपासणी करण्याचे आवाहन सरपंच श्री अब्दागिरे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयच्या दर्शनी भागात कोविड१९- जागृतीपर फलक लावण्यात आले.
याप्रसंगी हिंगला व वाड़ी दमाई येथील सरपंच शाहूराव अब्दागिरे, सरपंच उद्धवराव गायकवाड़, शरद तरवटे, गोपाल तरवटे, उद्धव पवार, नारायण तरवटे, शिवाजी अब्दागिरे,गोविंद अब्दागिरे आदी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment