श्री शिवाजी महाविद्यालयाच्या बारावीचा उच्चांकी निकाल

विज्ञान शाखेचा ९६.७३% टक्के निकाल

परभणी,प्रतिनिधी – येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील बारावीच्या विविध शाखेचा निकाल यशाची उज्वल परंपरा राखत उचांकी लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९६.७३% आहे. यांपैकी ७५% हून अधिक गुण मिळवून म्हणजे विशेष प्रावीण्यासह ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. १३३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर २३६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

विज्ञान शाखेसाठी ४२९ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते, त्यापैकी ४१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत कदम प्रताप कारभारी ९४.७७% प्रथम, कोनगृट्टे मयुर मलिक्कार्जुन ९२,३१% द्वितीय, पोटेकर वेदांत सुनील ९१.५४% तृत्तीय, कु. पवार श्रुती शंकरराव ९०.४६% चतुर्थ, खटिंग वैभव अनंता ८९.३८% पाचव्या स्थानी या उत्तीर्ण झाले आहेत.

वाणिज्य शाखेचा निकाल ९६.५५% असून महाविद्यालयातून कु. मुळे वैष्णवी शशिकात ९२.३१% गुण घेवून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. कुलकर्णी मृणाल रमाकांत ९१.५४% गुण मिळवून द्वितीय तर पवार ओंकार सदाशिव ९१.२३% गुण घेवून तृत्तीय स्थान प्राप्त केले आहे. ८८ विद्यार्थी विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांची संख्या ८६ आहे. ५१ द्वितीय श्रेणीत आहेत, एकूण २३४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कला शाखेचा निकाल ८०.१७% आहे. निकालामध्ये कदम गोंविंद शंकर याने ८६.४६% गुण प्राप्त करून महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे, काळे तुकाराम भिमराव ८५.३८% द्वितीय तर रिठे ओमप्रकाश गणपत ८३.८५% तृत्तीय आहे. २७ विद्यार्थी विशेष प्रावीण्याने तर ८२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. १५५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण आहेत. ३४३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, २७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (एचएससीव्हीसी) शाखेचा निकाल ७३.१७ % असून गाढे कन्हैया माधवराव ६८% गुण प्राप्त करुन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे, केंद्रे ऋषिकेश सदाशिव ६६.३१% गुण मिळवून द्वितीय तर पांचाळ अशोक पुरभाजी ६५.२३% गुण मिळवून तृत्तीय येण्याचा बहुमान मिळविला आहे. १५ विद्यार्थी प्रथम श्रेणी आणि १५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाशराव सोळके, सरचिटणीस आ.सतीशराव चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य श्री हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य
डॉ. श्रीनिवास केशेट्टी, उपप्रचार्या डॉ विजया नांदापूरकर, उपप्राचार्य प्रा. आप्पाराव डहाळे, पर्यवेक्षक प्रा. बाबुराव आंधळे, उपप्राचार्य प्रा. अमृत पतंगे, कुलसचिव विजय मोरे तसेच सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.

गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

hsc resultparbhani
Comments (0)
Add Comment