कोरोना विषाणूचा संसर्ग भारतात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे देशभरामध्ये भितीचे वातावरण आहे. यामुळेच ग्राहकांच्या वस्तू खरेदी करण्याच्या पद्धतीत बदल झाल्याचे दिसतयं, म्हणजेच अत्यावश्यक गोष्टींचा पुरेपूर साठा करुन ठेवताना ग्राहक दिसत असल्याचे चित्र दिसतयं. सर्वच सार्वजनिक खरेदीची ठिकाणे यामध्ये मॉल, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, तरण तलाव यासारख्या सुविधा गेल्या वीस दिवसांपासुन बंद आहेत. बहुतांशी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगितले आहे तर काही कंपन्या बंद आहेत. साहजिकच खुप लोकं घरीच असल्याने अन्नधान्य आणि घरगुती वापराच्या वस्तूंचा साठा करण्याकडे अनेकांचा कल वाढलेला दिसतोय. मात्र मागील २० दिवसात कंडोमच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसतयं. या दरम्यानच्या काळात कंडोमची विक्री ३० ते ५० टक्क्यांनी वाढल्याचं समोर आलयं.
बऱ्याच वेळा ग्राहकांकडुन कमी संख्येने कंडोम खरेदी होते, मागच्या काही दिवसात मोठ्या आकाराची पाकीटं विक्री झाल्याची माहिती औषध विक्रेते सुहास गाडेकर यांनी दिली. बऱ्याच वेळा लोकं तीन कंडोमचे पाकीट विकत घेण्यास भर देतात. मात्र संचारबंदी काळात मोठ्या संख्येने जास्त कंडोम असणाऱ्या पाकीटांची विक्री वाढत चाललीय. १० ते २० कंडोम असणाऱ्या पाकिटांची विक्री वाढल्याचे दिसुन आलयं. नवीन वर्ष, college डे, राष्ट्रीय व पारंपारिक सणाच्या काळात कंडोमची विक्री प्रचंङ होत असते. माञ सध्या lock डाऊनच्या काळातही विक्रीत प्रचंड वाढ झालेली आहे.
या कंडोम विक्रीबरोबरच खुप शहरात गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री वाढल्याची माहिती समोर आलीय. पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असल्यामुळे साठा करुन ठेवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काही वर्षापुर्वी कंडोम घेताना भारतीयांना लाज वाटुन ते खरेदी करत नसत, आता लैंगिक शिक्षण आणि माहितीचा प्रसारामुळे लोकांना कंडोमचे महत्व कळलं आहे. त्यामुळे कंडोम खरेदीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जातयं. कंडोम खरेदीमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दुकानदार सांगतात.
आजच्या घङीला जगात सर्वात जास्त कंडोमचे ऊत्पादन मलेशियामध्ये होत असुन कोरोनामुळे मागील तीन आठवड्यापासुन ऊत्पादन बंद केल्याचे कळतयं. विविध देशाच्या सीमा बंद केल्यामुळे पुढील काही दिवसात १०० मिलीयन कंडोमचा तुटवडा जाणवणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. आशिया खंडात सर्वात जास्त ऊत्पादन होत असुन २०१५ मध्ये ३२६७४ मिलीयन ऊत्पादन झाल्याचं एका अहवालानुसार समोर आलयं. कंडोमचा वापर चीनमध्ये सर्वात जास्त होत असुन एकुण विक्रीच्या एक तृतीयांश विक्री फक्त चीनमध्ये होत असते. पुढील पाच वर्षात जागतिक बाजारपेठ ४४७० मिलियन वरुन ७०५० मिलियनवर जाईल अशी शक्यता अहवालात नमुद करण्यात आलीय.
सदाशिव पोरे
९६६५०५०६८१