संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळ्यास जास्तीत जास्त ५० लोकांना प्रवेश : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रस्थान सोहळा पार पाडू :
प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील
आळंदी देवाची – संपुर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोणा रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण वारकरी संप्रदायाचा वैभव सोहळा असणारा पंढरपूर ची आषाढी वारी वर कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पायी पालखी सोहळा रद्द झाल्याने प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत यंदाच्या वर्षी माऊलींच्या चल पादुका पंढरपूर कडे मार्गस्थ होणार आहे. तत्पूर्वी माऊलींच्या मंदिरात साध्या स्वरुपात प्रस्थान सोहळा निमंत्रित मानकरी, सेवेकरी, वारकरी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले, यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जास्तीत जास्तं ५० जनांना प्रस्थान साठी प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगितले आहे, आलेल्या व्यक्तींची थर्मल स्कॅन, सॅनीटायजर करुन, मास्क वापरूनच मंदीरात प्रवेश दिला जाणार आहे, वारकर्‍यांना सॅनीटायजर केलेले टाळ, पखवाज, पताका, संस्थान मार्फत उपलब्ध करून देण्यात येतील, संपुर्ण मंदिर परिसरात आणि भक्तनिवास परिसरात सॅनीटाईज केले जाणार असल्याचे संस्थान कमिटीने सांगितले, संस्थान च्या फेसबुक पेजवर प्रस्थान सोहळ्याचे आणि दशमी पर्यंत चे सर्व कार्यक्रम प्रसारण करण्यात येणार आहे, मंदीरात प्रस्थान सोहळा पार पाडल्यानंतर माऊलींच्या चल पादुका आजोळ घरात दशमी पर्यंत वास्तव्यास असेल.

 

कोरोणा मुळे आळंदी शहरात मंदिरालगत गावठाणातील एक महिला मृत पावल्याने सदर परिसर बफर झोन घोषित करण्यात आल्याने सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थितीत राहण्यासाठी वारकरी बांधवांनी आणि आळंदीकर ग्रामस्थांनी आग्रह धरु नये तसेच मंदिर परिसरात सुद्धा विनाकारण गर्दी करू नये आपण सर्वांनी मिळून कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करु असे आवाहन सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी केले आहे.



Comments (0)
Add Comment