तालुक्यातील 500 ते 600 गरजवंताना केली मदत
अंबाजोगाई, प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणा-या गोरगरीब, कष्टकरी गरजू नागरिकांच्या मदतीसाठी संपदा ट्रस्ट अहमदनगर शाखा अंबाजोगाई धावुन आली असुन मुख्य व्यवस्थापक प्रीतीलता गायकवाड यांच्या सूचनेवरून अंबाजोगाई आरोग्य अधिकारी अर्चना चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील राजेवाडी येथील महिला प्रवर्तक अनिता सुरवसे व पुष्पा वाघमारे यांनी संपदा ट्रस्टच्या माध्यमातून राजेवाडी या ठिकाणी गरजू महिलांना व कुटुंबांना रेशन व किराणा साहित्याचे वाटप केले. ऐन संकटकाळात गरजूंना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन सुरु आहे, हातावर पोट असणारे, रोजंदारी, कष्टकरी कामगार व गोरगरीब जनता यामुळे मोठ्या अडचणीत सापडली आहे, त्यांचा रोजगार बंद झाला आहे. अशा कठीण प्रसंगात अहमदनगर येथिल संपदा ट्रस्ट गरजूंच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जोपासत धावुन आली असुन संपदा ट्रस्टच्या मुख्य व्यवस्थापिका प्रीतीलता गायकवाड यांच्या सूचनेवरून तसेच ट्रस्टच्या अंबाजोगाई शाखेच्या आरोग्य अधिकारी अर्चना चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील राजेवाडी या ठिकाणी येथिल महिला प्रवर्तक अनिता सुरवसे व पुष्पा वाघमारे यांनी संपदा ट्रस्टच्या माध्यमातून गावातील विधवा तथा गरजवंत महिलांना व कुटुंबियांना रेशन व किराणा साहित्याच्या किटचे वाटप केले. गरजूंना दिलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटमध्ये 15 किलो गहु, 5 किलो
तांदूळ,2 किलो साखर,2 किलो गोडतेल,1 किलो तुरडाळ, चहा पावडर, मसाला, हळद, जिरा, साबण आदी साहित्य वाटप केले.
दरम्यान कोरोनामुळे देशात व राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा वेळी गरजवंताला मदत झाली पाहिजे.संपदा ट्रस्ट नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत आली आहे.या पार्श्वभूमीवर संपदा ट्रस्ट अहमदनगर च्या वतीने अंबाजोगाई तालुक्यातील 30 ते 34 गावांमध्ये जवळपास 500 ते 600 गरजवंत महिलांना व नागरिकांना ठिकठिकाणच्या महिला प्रवर्तकांच्या माध्यमातून अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती संपदा ट्रस्टच्या अंबाजोगाई शाखेच्या विभागीय तथा तालुका आरोग्य अधिकारी अर्चना चौरे प्रमोटर पुष्पा वैरागे वंदना मस्के महिला प्रवर्तक अनिता सुरवसे पुष्पा वाघमारे आदींनी दिलीआहे.ऐन संकट काळामध्ये मिळालेल्या या मदतीमुळे गरजवंत कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.