सरकारने आरोग्य विमा नाकारल्याने नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

माजलगांवमध्ये न.प. कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला निषेध
माजलगांव, प्रतिनिधी – राज्य शासनाने कोरोना महामारीच्या संकटात पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना कवच म्हणून जीवन विमा जाहीर केला. त्याच धर्तीवर न. प. कर्मचारीसुध्दा आपला जीव धोक्यात घालून काम करत असताना त्यांनाही विमा कवच आवश्यक असल्याने राज्य शासनाकडे राज्य न. प. कर्मचारी संघटनेने मागणी केली आसता शासनाने नाकारल्याने माजलगांव न. प. कर्मचाऱ्यांनी अध्यक्ष शिवहार शेटे यांच्या नेतृत्वाखाली शासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून काम केले आहे.
जागतिक महामारीच्या धरतीवर जग हादरले असताना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याने शासनाने अत्यावश्यक काळजी घेतली आहे. याबाबत कोरोना निर्मूलनासाठी आरोग्य कर्मचारी व पोलीस आपला जीव धोक्यात घालून दिवस – रात्र काम करत असताना तेवढ्याच क्षमतेने महाराष्ट्रात नगर पालिका, महानगर पालिकेचे कर्मचारीही काम करत आहेत. त्यांना ही या महामारीच्या पार्श्वभूमीवर जीवन सुरक्षा कवच म्हणून विमा संरक्षण देण्याची मागणी केली असून ती शासनाने नाकारल्याने शासनाचा निषेध करत माजलगांव न. प. च्या कर्मचारी संघटनेसह पाणीपुरवठा सफाई कामगार संघटनेच्या वतीने २७ रोजी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवहार शेटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयीन अधीक्षक गणेश डोंगरे, अतुल तोंडारे, सुनील राठौर, आशिष तुसे, प्रतिमा पासलकर, करडे, जगदीश जाधवर, संतोष घाडगे, रणजित रोमन, महेमूद बेग, पांडुरग कुलकर्णी, वामन काजळे, अनिल दडके, नागनाथ बुरंगे, नरेंद्र पानपट आदी कर्मचारी सहभागी होते.

Comments (0)
Add Comment