सर्व वीज ग्राहकांना बिलात सरसकट ५० टक्के सवलत द्यावी – ग्राहक पंचायतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : कोरोणाच्या संसर्गामुळे आलेल्या संकटात वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व वीज ग्राहकांना वीज बिलात एप्रिल २०२० पासून सहा महिन्यांपर्यंत सरसकट ५० टक्के सवलत द्यावी. तसेच तीन महिन्यांपर्यंत विलंब आकार व दंड न लावता बिल भरण्यास सवलत देण्यात यावी. अशी आग्रहाची मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नाशिक विभाग तर्फे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे व ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदानात कोविड- १९ या विषाणूच्या प्रादुर्भावाने लॉकडाऊन असल्याने सर्व जनता घरी बसली आहे. सर्व सामन्यांसह सर्वांचे उत्पन्नाचे स्त्रोत बंद झालेले आहेत. उत्पन्नाचा मार्ग नाही. यामुळे सर्वच अडचणीत आहेत. उन्हाळा असल्यामुळे पंखे, एसी, टीव्ही चालू आहेत. त्यामुळे वीज बिलात वाढ होत आहे.

सध्याच्या संकटकाळात अनेकांची कमाई कमी आणि बंद झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ तसेच इतर वीज कंपन्यांनी यांच्या विज ग्राहकांना एप्रिल २०२० पासून सहा महिन्यांपर्यंत (मागील तीन आणि पुढील तीन महिन्यांच्या ) बिलात तीनशे युनिट पावेतो ग्राहकांना सरसकट ५० टक्के सवलत द्यावी, तसेच बिल भरण्यास तीन महिन्यांपर्यंत विलंब झाल्यास विलंब आकार व दंड आकारू नये. तसेच थकबाकीदार म्हणून वीज पुरवठा खंडित करू नये, असे ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक विभाग तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे व ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनादिलेल्या निवेदनावर ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नाशिक विभाग अध्यक्ष प्रा. बाबासाहेब मार्तंडराव जोशी, संघटक श्री. अरुण भार्गवे, नाशिक महानगर प्रमुख अँड. सुरेंद्र सोनवणे, नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री. सुधीर काटकर यांनी सह्या केलेल्या आहेत.

latest newslight billmsebnashikनाशिकलॉक डाऊन
Comments (0)
Add Comment