मॅपिंग मध्ये गावाचं नावच नाही
माजलगांव,प्रतिनिधी :- सोयाबीन, तुर, मुग, कापूस, तीळ, बाजरी या खरीप पिकाचा पिक विमा भरण्यासाठी केवळ बारा दिवस मिळाले असताना त्यातील दोन दिवस गेले आहेत. माजलगांव तालुक्यातील सुलतानपूर (माळेवाडी) या गावाचा मॅपिंग मध्ये समावेश दाखवत नसल्याने या गावातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी अडचण निर्माण झाली असून पिक विमा भरायचा कसा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी यांना गावकऱ्यांनी मॅपिंग मध्ये गावाचे नाव नसल्याचे निवेदन सोमवारी देवु केले.
यंदा पाऊस वेळेवर आल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या यामध्ये शेतकऱ्यांनी तूर, सोयाबीन, मूग, कापूस, तीळ, बाजरी या पिकाची लागवड केली शासनाने पिकाला संरक्षण म्हणून पिक विमा शेतकऱ्यांना देऊ केला परंतु बीड जिल्हा यंदाच्या वर्षी पीक विम्याच्या बाबतीत कोणतीही कंपनी तयार नव्हती. शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर बीड जिल्ह्याला पिक विमा भरण्यासाठी अवघ्या बारा दिवसाचा वेळ मिळाला त्यातील दोन दिवस गेले आहेत. माजलगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी केवळ दहा दिवसाचा अवधी शिल्लक असताना तालुक्यातील सुलतानपूर (माळेवाडी) या गावाचे व्हिलेज मॅपिंग चुकीचे दाखवत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
पिक विमा भरण्याचा अवधी अगदीच अत्यल्प असल्याने आणि त्यात मॅपिंग मध्ये गावाचे नाव दाखवत नसल्याने पीक विमा कसा भरायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे. सुलतानपूर (माळेवाडी) या गावाचे व्हिलेज मॅपिंग हे नित्रुड झाले असून या गावाचे महसूल मंडळ हे किट्टी आडगाव आहे मॅपिंग मध्ये चूक असल्याने शेतकऱ्यांना पीक विमा भरता येत नाही.
सदरील गावातील शेतकऱ्यांना पीक विमा भरता यावा यासाठी तालुका कृषी अधिकारी यांना पाटील साहेब प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीराम विष्णुपंत नरवडे व गावकऱ्यांनी सदरील चुकी दुरुस्त करून महसूल मंडळ गावाचा समावेश करून शेतकऱ्यांची होणारी अडचण थांबविण्यात यावी अशी मागणी सोमवारी दिनांक २० रोजी केली आहे. सदरील निवेदनावर श्रीराम नरवडे, गणेश तौर, आकाश नरवडे, गोविंद लोखंडे, श्रीराम निंबाळकर, मेटे यांच्या स्वाक्षर्या आहेत.