WordPress database error: [Disk full (/tmp/#sql-temptable-82db-7355b9-1d367.MAI); waiting for someone to free some space... (errno: 28 "No space left on device")]
SHOW FULL COLUMNS FROM `wp_zh06kdxwfh_options`

सात महिन्यापासून पगार नाही; माजलगांव शहराचा पाणी पुरवठा बंद – शब्दराज

सात महिन्यापासून पगार नाही; माजलगांव शहराचा पाणी पुरवठा बंद

माजलगांव, प्रतिनिधी – माजलगांव नगर परिषदेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा सात महिन्यापासून पगार थकल्याने त्यांनी आजपासून (गुरुवार) काम बंद पुकारले आहे. त्यामुळे माजललगांव शहराचा पाणी पुरवठा बंद आहे. परिणामी लाकडाऊन काळात पाण्यासाठी नागरिकांवर भटकंती करण्याची नामुष्की येऊ शकते.
माजलगांव नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात १९ कर्मचारी तर अग्निशमन विभागात १५ कर्मचारी आहेत. या कर्माचाऱ्यांचा मागील सात महिन्यापासुन पगार थकला आहे. या कर्मचाऱ्यांनी तोंडी व लेखी पगार देण्याची मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार केली. मात्र न. प. प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. जिवनावश्यक विभाग असल्याने लॉकडाऊन काळात हे कर्मचारी दिवस – रात्र काम करत आहेत. तर दुसरीकडे या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटूंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे न. प. च्या पाणीपुरवठा व अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी आज ( दि.२३ ) गुरूवार पासुन काम बंद आंदोलन पुकारले आहे.

त्यांचा प्रश्न लवकर सोडवा
नगर परिषदेचे पाणी पुरवठा कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडतात. सध्याच्या काळात ते करीत असलेले काम मोठे आहे. त्यांनी काम बंद आंदोलन पुकारले तर माजलगांवातील हजारो नागरिकांना पाण्यासाठी रस्त्यावर फिरावे लागणार आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचा बोऱ्या वाजण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी या प्रकरणात लक्ष घालून या कर्मचाऱ्यांचा प्रश्न ताबडतोब सोडवावा अशी मागणी माजलगांवातील नागरिक करीत आहेत.

Comments (0)
Add Comment