सामाजिक जबाबदारी जपत नगरसेवक पंचशील कांबळे यांची जि. प.हायस्कूल लोहा येथे भेट

लोहा – जिल्हा परिषद हायस्कूल लोहा चे, माजी विद्यार्थी तथा विद्यमान नगरसेवक,विरोधी पक्षनेते, गटनेते नगर परिषद लोहा, आयु. पंचशील दादा कांबळे यांनी हायस्कूल ला भेट देऊन, त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले शालेय विकासाची पाहणी करून, शाळेचे मुख्याध्यापक, व स्वछतादूत राजीव तिडके सर यांचे कार्य पाहून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

स्वतःच्या दोन मुलासोबत रात्र दिवस मेहनत घेऊन, शाळेत केलेल्या काम खरंच वखण्याजोगे व अभिनंदनास पात्र असल्याचेही यावेळी ते म्हणाले..
येणाऱ्या काळात, शाळेसंबंधी ,ज्या काही अडचणी अथवा प्रश्न असतील ते सोडवण्यास मी, माजी विद्यार्थी म्हणून सदैव कटिबद्ध असेल हेही यावेळी त्यांनी सांगितले,तसेच ज्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी श्रमदान, तथा आर्थिक मदत केली, त्यांचे आभार माणून जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी आपले नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन शाळेसाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन ही पंचशील कांबळे यांनी केले.

समाजातील जबाबदार घटकांनी शाळेसंबधी विधायक कार्याचे कौत्तक केल्यामुळे आम्हाला अजून कार्य करण्याची ऊर्जा मिळाली असे सांगितले,शाळेचे शिक्षक राजीव तिडके यांनी पंचशील कांबळे यांचे शाळेच्या वतीने आभार मानले. यावेळी शिक्षक संघटना पदाधिकारी मंगल सोनकांबळे, गफ्फार शेख, प्रेरक संघटनेचे सोनकांबळे, अनिरुद्ध तिडके, अमित तिडके आदी उपस्थित होते.

वनामकृविचा सुरक्षा यंत्रणेवर लाखोंचा खर्च; महागड्या कंपनीसोबत अर्थपूर्ण व्यवहार
जिल्हा विकास योजनेत सर्वाधिक प्राधान्य जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी – पालकमंत्री अशोक चव्हाण
बुलढाणा जिल्यात ७ जुलै ते २१ जुलै पर्यंत लॉक डाऊन पालकमंत्र्यांची घोषणा



Comments (0)
Add Comment