वडवणी – वडवणी शहरातील साळींबारोड वरील कोर्टासमोरील इमारत जेथे १ कोरोना विषाणू संसर्ग लागन झालेला ६७ वर्षे वयाचा रुग्ण आढळून आला आहे याचा इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रमाणे फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १ ९ ७३ चे कलम १४४ नुसार वडवणी शहरातील साळींबारोड वरील कोर्टासमोरील इमारत जेथे हा रुग्ण व इतर संशयित व्यक्ती राहात होते . कन्टेनमेंट झोन ( Containment zone ) म्हणून घोषित करण्यात आला आहे . या इमारतीच्या सभोवतालचा परिसर बफर झोन ( Buffer zone ) म्हणून घोषित करण्यात आला आहे .
वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ में २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ ( १ ) ( ३ ) लागू करण्यात आले आहेत . तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश , सुधारीत आदेश , सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील .