भीमगीत संगीत रजनीचा निधीही मदतकार्यासाठी केला खर्च
परभणी – दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस युवानेते सिध्दार्थ हत्तीअंबीरे संगीतरजनीचे आयोजन करत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट आल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करुन होणारा खर्च कोरोनाच्या संकटात साडलेल्या
गरजूच्या मदतीसाठी खर्च करण्यात आला आहे. 13 एप्रिल ते 30 एप्रिल या काळात जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत एक हजार कुटूंबांना किटचे वाटप करण्यात आले आहे. याच बरोबर पत्रकारांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप ही करण्यात आले. समस्त परभणीकर 30 एप्रिलची वाट आतुरतेने पहात असतात. कारण 30 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाचा समारोप महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायकाच्या भीमगीत संगीत रजनीच्या आयोजनाने होत असतो. 30 एप्रिल आणि भीमगीत संगीत रजनी हे समिकरण परभणी जिल्ह्यात रूढ झाले आहे. परंतु या वर्षी संगीत रजनीचा निधी कारोनाच्या लॉकडाऊनमुळे स्त्रस्त झालेल्या गोरगरिबांना जीवनवश्यक वस्तुंचे वितरण करण्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. अडचणीत सापडलेल्या 1000 परिवाराला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. ज्या मध्ये 10 किलो गव्हाचे पीठ, 5 किलो तांदूळ,1 किलो तुरीची डाळ, 1 लिटर गोडेतेल, 1 किलो मीठ व 500 ग्राम कांदा मिरची मसाला अशी किट जी एका छोट्या कुटुंबाला साधारणतः पंधरा दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले जात आहे. प्रशासकीय इमारत, सुजाता कॉलनी, प्रियदर्शनी नगर, संबोधी विद्यालय, धार रोड, भीमनगर इत्यादी वसाहती वाटपाचे नियोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या यादीतील गरजवंतांना प्रामुख्याने दिव्यांग, कलावंत, राशनकार्ड नसलेल्या गोरगरिबांना व्यक्तिगत अंतराचा नियम पाळून वाटप करण्यात आले. प्रा.डॉ.संजय जाधव, सुधीर भाऊ कांबळे, अविनाश मालसमिंदर सर, प्रदीप जोंधळे, मकरंद बाणेगावकर, रमेश सिद्धेवाड व सिद्धार्थ भाऊ हत्तिअंबिरे मित्र मंडळातील स्वयंसेवकानी याकामात पुढाकार घेतला.