माजलगांव, प्रतिनिधी – माजलगांव तालुक्यात गेल्या दोन वर्षां पासून सुरेंद्र रेदासनी यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी महासंघ सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याचे चित्र आहे . आपण समाजाप्रती काही देणे लागतो या भावनेतून अनेक लोक उपयोगी कार्यक्रमात त्यांचा जाणवत असलेला उतस्पूर्त सहभाग शहरवासीयांच्या कौतुकास पात्र असून कोरोना महा मारीच्या संकट काळातही व्यापारी महासंघाने नागरिकांकडून वाहव्वा मिळवली आहे .
गेल्या दोन वर्षाखाली व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी सुरेंद्र रेदासनी यांची निवड झाल्यानंतर ग्राहक आणि व्यापार या चौकटी बाहेर पडून व्यापारी महासंघाने अनेक लोक उपयोगी कामे करण्यास सुरुवात केली . ज्यात केरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी सोबत दोन लाख ७५ हजार रुपयांचा निधी केरळ सरकारला दिला . जिल्ह्यात स्वच्छतेचा प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या माजलगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षांचा भव्य सत्कार करून शहरा प्रती काही चांगलं करणाऱ्याला यातून एक प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला . शहरातील रस्त्या नाल्याच्या प्रश्नासाठी निस्वार्थ भावनेने व्यापारी महासंघाने रस्त्यावर उतरण्याचे काम केले आहे . माजलगांव तालुका अंबाजोगाई जिल्ह्यात जाऊ नये यासाठी पत्रकार संघाच्या आंदोलनात सहभागी होणारा व्यापारी महासंघ गरिबांच्या अडीअडचणीत ही अनेक वेळेस धावून जाताना दिसून आला . शहरात घेतलेली अभूतपूर्व व्यापारी परिषद माजलगांव तालुक्याचे नाव व्यापारी जगतात एका उंचीवर नेण्याचे काम व्यापारी महासंघाने केले आहे . कुठलाही स्वार्थ डोळ्यापुढे न ठेवून केवळ आपण समाजाप्रती काही देणे लागतो या भावनेतून सौदा , व्यापार , नफा , ग्राहक , मालक , यापलीकडे जाऊन सामाजिक संवेदना जोपासणारा माजलगांव चा व्यापारी महासंघ कोरोना महामारीच्या संकट काळात प्रशासनासोबत खांद्यास खांदा लावून काम करताना दिसून येत आहे . याकाळात उपासमार सोसणाऱ्या १५१ गरीब कुटुंबांना जवळपास पंधराशे रुपयाचे किराणा चे किट देऊन आपले कर्तव्य पूर्ण केले . नैसर्गिक आपत्ती असो सामाजिक कर्तव्यास नेहमी तत्पर असणारा सुरेंद्र रेदासनी यांचा व्यापारी महासंघ आणि त्यांची टीम गणेश लोहिया , सुनील भांडेकर जनतेचे कौतुक मिळवताना यानिमित्ताने दिसत आहे .