बीड, प्रतिनिधी – येथील पंचायत समितीमधील १४ कोटी ८० लक्ष रुपयांच्या फसवणुक व अपहार प्रकरणी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते . त्यानुसार प्रभारी गटविकास अधिकारी रविंद्र तुरुकमारे यांच्या फिर्यादीवरुन तीन कर्मचाऱ्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
ऑपरेटर बंडु राठोड , तांत्रिक सहाय्यक प्रशांत आबुज व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी शाम पंडित असे गुन्हा दाखल झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची नावे आहेत . फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे , महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत मंजुर कामाच्या मूळ संचिका , प्रशासकीय , तांत्रिक मान्यता , कार्यारंभ आदेश अन् कामाची अंदाजपत्रके नसतानाही व त्याची तपासणी न करताच नरेगा संकेतस्थळावर कामाचे बोगत संकेताक क्रमांक तयार केले . तसेच दिलेल्या जि.प.गटाच्या कार्यक्षेत्राबाहेर जावून कामाचे प्रत्यक्ष ठिकाण निश्चित करुन अप्रुव्हड करुन १४ मार्च ते १८ मार्च २०२० या कालावधीत बोगस हजेरीपत्रक निर्गमित केले . जे की , संकेतस्थळावर शून्य करण्यात आले आहेत . अन् त्याचे पेमेंट झालेले नाही . शिवाय कोणतेही अभिलेखे उपलब्ध नसताना १४.८० कोटींची कुशल देयके ऑनलाईन केले . यातून शासनाचे व वरिष्ठ अधिकारी यांची फसवणुक व अपहार प्रकरणी तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पोनि.सुनिल बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे .
बीड जिल्हा बँक : माजलगांव कारखान्याचा कर्ज मागणी प्रस्ताव येताच ११ संचालक आजारी
विद्यापीठांच्या परीक्षांबाबतची अनिश्चितता संपणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लाॅकडाऊन ५.० संदर्भात केंद्र सरकारची मोठी घोषणा