हनुमान नगर फॉरेस्ट नाका येथे टाकण्यात आले वाढीव नवीन विद्युत पोल

“आस्ताना मेहबुबे सुबहानी सर्व धर्म समाजसेवा संस्था (रजि.)” च्यावतीने (MSEB) ला केलेल्या मागणीला अखेर मिळाले यश

अंबरनाथ, जाफर वणू – अंबरनाथ पश्चिमेकडील हनुमान नगर, फॉरेस्ट नाका येथील विजेचे पोल टाकण्याकरिता “आस्ताना मेहबुबे सुबहानी सर्व धर्म समाजसेवा संस्था (रजि.)” चे संस्थापक-अध्यक्ष अब्दुल सत्तार वणू ह्यांनी महावितरणकडे वारंवार लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा केल्यानंतर याठिकाणी विजेचे पोल टाकण्यात आले होते. त्यातील उर्वरित राहिलेले पोल तातडीने टाकण्यात यावे, शक्य नसल्यास केबल टाकून येथील प्रश्न मार्गी लावावा. अशी मागणीही संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. अखेर या मागणीला दि.25 जून 2020 रोजी यश मिळाले असून या परिसरात महावितरणकडून वाढीव नवीन विद्युत पोल टाकण्यात आले आहे. तसेच संस्थेच्या वतीने व हनुमान नगर फॉरेस्ट नाका रहिवाशांच्या वतीने समाजसेवक अब्दुलसत्तार वणू ह्यांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश लढढा व कनिष्ठ अभियंता हरड यांच्या आभार मानले.

हनुमान नगर, फॉरेस्ट नाका याठिकाणी नवीन ६ विद्युत पोल टाकण्यासंदर्भात सन २००८ मध्ये “आस्ताना मेहबुबे सुबहानी सर्व धर्म समाजसेवा संस्था (रजि.)” चे संस्थापक-अध्यक्ष अब्दुल सत्तार वणू यांनी महावितरणकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार महावितरणकडून नवीन पोल मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ४ पोल हनुमान नगर याठिकाणी दि. २८ फेब्रुवारी २०१५ रोजी बसविण्यात आलेले होते आणि उर्वरित पोल बसविण्याचे राहिलेले होते. सदरील पुढील परिसर हा झोपडपट्टीचा असल्याने सदर ठिकाणी आणखीन नवीन ६ पोल तातडीने बसविण्यात यावे अशी मागणी संस्थेच्या वतीने मुख्य कार्यकारी अभियंता व अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडे सन २०१९ मध्ये करण्यात आलेली होती. कारण, या परिसरातील पुढील भागात राहणाऱ्या नागरिकांनी विद्युत जोडणी करून घेतलेली आहे. सदर घराच्या मध्ये अंतर खूपच जास्त पडत असल्याने विजेच्या सर्व्हिस वायरी लोंबकळत आहे. त्यामुळे वायरीला लहान मुले काठीने खेचत असल्याने येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदर ठिकाणी पोल टाकणे शक्य नसल्यास तातडीने केबल टाकून हा प्रश्न मार्गी लावावा. अशीही मागणी “आस्ताना मेहबुबे सुबहानी सर्व धर्म समाजसेवा संस्था (रजि.)” चे संस्थापक-अध्यक्ष अब्दुल सत्तार वणू यांनी महावितरणकडे करण्यात आली होती. त्यानुसार अखेर त्या मागणीला यश मिळत शुक्रवारी दि.25 जून 2020 रोजी महावितरणकडून हनुमान नगर फॉरेस्ट नाका याठिकाणी वाढीव नवीन विद्युत पोल टाकण्यात आले.

Comments (0)
Add Comment