हिंगणघाट- वर्धा,दि 18 (प्रतिनिधी)ः
हिंगणघाट तालुक्यातील जाम गाव हे विकासापासून दूर आहे. पाण्याचा प्रश्न हाती घेऊन 1कोटी 80 लाखाची योजना मंजुरी साठी टाकली आहे. दिवाळी च्या अगोदर नागरिकांना पाणी मिळेल व इतर ही जामच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणाचा माझा प्रयत्न राहील. असे मत जाम येथील व्यायामशाळेच्या लोकार्पण समारंभात आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केले.
आमदार समीर कुणावार यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून जाम येथे व्यायामशाळा उभारली. अध्यक्षस्थानी पी व्ही टेक्स्टाईल चे व्यवस्थापक भुपेंद्र शहाणे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय युवा मोर्चा चे प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समनव्यक प्रा. मेघश्याम ढाकरे, जाम चे सरपंच सचिन गावंडे, उपसरपंच अजय खेडेकर, पोलिस पाटील कवडू सोमलकर ,तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष गजानन मुंगसे ,पवार व सर्व सदस्य गण मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार कुणावार म्हणाले डॉ. बाबासाहेबच्या संविधानाने आम्हाला ज्या खुर्च्या दिल्या त्या बसण्यासाठी नाही तर जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दिल्या तेंव्हा लोकांचे – युवकाचे जे प्रश्न आहे ते सोडविण्या साठी माझा प्रयन्त आहे युवकांनी खेळा च्या माध्यमातून तसेच अभ्यासाच्या माध्यमातून विविध स्पर्धात्मक परीक्षेला समोर जाऊन जाम येथील युवकांना चांगल्या नोकऱ्या लागल्या पाहिजे या करिता एक चांगली अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
तर भुपेंद्रजी शहाणे यांनी जाम गावाच्या विशेष समाजाभिमुख कामे करण्याचा सतत प्रयत्न राहील असे सांगितले.
या वेळी सरपंच सचिन गावंडे यांनी जाम मध्ये विकास कामाची तडफड पाहून आमदार समीर कुणावर यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सचिन गावंडे यांनी केले तर संचालन ग्रामविकास अधिकारी ए एस धोटे, यांनी केले तर आभार गजानन मुंगसे यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीते साठी ग्रामपंचायत सदस्य सनी निवटे, राहुल पाटील,अभिलाष गिरडकर,सौ चंदाताई खेळकर, सौ साधनाताई पुसदेकर,कविताताई आटोळे,पंचफुल, खेकारे,रमाबाई शंभरकर,अनिल खुडसंगे, मोहन सराटे,रणजित वाढइ इत्यादींनी परिश्रम घेतले.