हिंगणघाट, दशरथ ढोकपांडे – शहरातील जगन्नाथ वार्ड येथे जोशी नामक तंबाकू विक्रेत्याचा दहा पोते सुगंधित तंबाकू जप्त केला. काल रविवार रोजी हिंगणघाट पोलिसांनी सदर कारवाई केली असून जवळपास पंचेविस हजार रूपयाचा माल जप्त केला.
काही जीवनावश्यक वस्तुसह सुगंधित तंबाकुची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी रविवारी एचडीएफसी बैंकेसमोर उभ्या असलेल्या (ट्रक क्र.एमएच ४९ ऐटी २८६०)मधुन सदर माल खाली करीत असतांना रंगेहाथ पकड़ले.परंतु यावेळी शहरातील तंबाकूविक्रेता बन्नू जोशी घटनास्थळावरुन पसार झाला. ट्रकचालकाची माहिती घेतली असता त्याचेकडे नागपुर येथून जीवनावश्यक वस्तु आणण्याचा परवाना होता.
पोलिसांनी सदर कारवाईत दहा प्लास्टिक पोते जप्त करुन ट्रकचालकास मात्र तात्काळ सोडून दिले.तर तंबाकूतस्करी करणाऱ्या बन्नू उर्फ बनवारी गिरधारी जोशी याचेवर गुन्हा नोंद केला.
शहरातील अनेक व्यापारी सद्या तंबाकूतस्करी मधे गुंतले असून सद्या अवैध दारूनंतर सुगंधित तम्बाकु तस्करीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफ़ावलेला आहे.काही दिवसांपूर्वी गुरुनानक वार्ड येथेसुद्धा धाड़ मारून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाकू पकडण्यात आला होता.परंतु हे प्रकरण दडपण्यात आले. कालच्या कारवाईत देखील ट्रक चालकास सोडून देण्यात आल्याने पोलिस कारवाईसंबंधात शहरात उलटसुलट चर्चा आहे.