हिंगणघाट शहरात बहुजन मुक्ती पार्टीने केले धक्का मारो आंदोलन

हिंगणघाट,दि 15 (प्रतिनिधी)ः
बहुजन मुक्ति पार्टी महिला आघाडी व संलग्न संघटना अंतर्गत वर्धा जिल्ह्यात मंगळवारी (दि.15)  केंद्र आणि राज्य सरकारने लादलेल्या महागाईमुळे महाराष्ट्रातील ३६ जिल्हा कार्यालयावर आणि 358 तहसील कार्यालयावर एकाच वेळेस बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीतर्फे ११ ते 2 या कालावधीत मोठ्या संख्येने कलम १९(१) नुसार आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून हिंगणघाट शहरात बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी, युवा आघाडी तसेच संलग्न संघटना तर्फे संविधानीक मार्गाने आंदोलन करण्यात आले आहे.

 विद्यमान सरकारच्या विरोधातील मागण्या महामहीम राष्ट्रपती यांना खालीलप्रमाणे आहेत.,, डिझेल, स्वयंपाकाची गॅस यांचे भाव कमी करा.,खाद्य तेलाचे भाव कमी करा,सरकी व सरकीढेप यांचे वाढलेले भाव कमी करा,इलेक्ट्रिक चे वाढलेले बिल कमी करा.,कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता शिधा वाटप केंद्रातून गहू, तांदळासोबत खाद्यतेल, चनादाळ, तुरडाळ तसेच हळदी पावडर, मिरची पावडर व मसूर डाळ इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा कारण कोरोणावर लॉकडाऊन हा काही पर्याय नाही त्यामुळे लॉक डाऊन लावण्यात येऊ नये., ह्या आमच्या वरील मागण्या मान्य न केल्यास खुर्ची खाली करा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनावर राहील अशा प्रकारचा इशारा शासनास देण्यात आला. या आंदोलनामध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टीचे माननीय मडावी, भारत मुक्ती मोर्चाचे सुरज ताकसांडे, इंडियन लायर असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संदीप कांबळे, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्कचे तालुका अध्यक्ष चंद्रहास्य कांबळे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे ता.अध्यक्ष गजाननजी माऊसकर, राष्ट्रीय शिकलीगर शीख मोर्चाचे तालुका अध्यक्ष साधूसिंग भादा, बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत जवादे, बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीचे श्रीमती येनोरकर मॅडम, बी. एम. पी. चे जिल्हा अध्यक्ष गेमदेव मस्के, उपाध्यक्ष संजय ढोकपांडे व बी. एम. पी. चे तालूका युवा अध्यक्ष संजय डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले‌.

Comments (0)
Add Comment