हेलपिंग हँड सामाजिक संस्थेच्या वतीने ‘फादर्स डे’ साजरा 

ठाणे, प्रतिनिधी – रोजच्या दैनदिन जीवनात वावरत असतांना एक दिवस   वृद्धासोबत घालवत  कल्याण येथील  हेलपिंग हँड सामाजिक संस्थेने अंबरनाथ मधील बेघर वृद्धाश्रमात  वृद्धासोबत  ‘फादर्स डे’  साजरा करून  सामाजिक बांधिलकी जपली आहे.

कोरोनाचे संकट असल्यामुळे  सर्वांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. या कोरोना विषाणूला  वृद्धांना देखील सामोरे जावे लागत आहे. व त्यांच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे.  ही भीती घालण्यासाठी  एक दिवस  आपल्या आजी, आजोबांच्या वयाच्या असणाऱ्या  वृद्धासोबत राहून कल्याण येथील  हेलपिंग हँड सामाजिक संस्थेने अंबरनाथ येथील  बेघर  वृद्धाश्रमातील आजी आजोबांचे  आरोग्य चांगले राहावे म्हणून नारळ पाणी वाटप करून आणि त्यांच्या सोबत थोडा वेळ घालवून ‘फादर्स डे’ साजरा केला.

यावेळी हेलपिंग हँड सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन  राऊत, सागर साबळे,तुषार धांडे,कुणाल सातपुते, संकेत गाडेकर, गणेश सोनावणे, प्रथम अवसरे  उपस्थित होते.

चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार सध्या जैसे थे…

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

mumbaithane
Comments (0)
Add Comment