१ जुलै कृषी दिनाचे औचित्य साधुन राज्यात कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला

नाशिक,प्रतिनिधी –  नांदगांव येथे आमदार सुहास (आण्णा) कांदे यांचे हस्ते कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या जयंती निमित्त दरवर्षी १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या कृषी दिनाचे औचित्य साधुन राज्यात १ जुलै ते ७ जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जाणार आहे.

नांदगांव पंचायत समिती व कृषी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने नांदगांव तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जात असुन नांदगांव पंचायत समिती येथे कै. वसंतराव नाईक यांचे प्रतिमेचे पुजन करून व चित्र रथास हिरवा झेंडा दाखवुन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ केला. नांदगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी बंधारे बांधणे व शेतीसाठी नवीन योजनांसाठी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन आमदारांनी केले.

तसेच ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेळीपालन, कुकुटपालन, दुग्ध व्यवसाय या सारखे जोडधंद्याना प्रोत्साहन देण्यासाठी पंचायत समिती व कृषी विभागाने प्रयत्न करावे तसेच त्यासाठी देखिल जास्तीत जास्त अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत पिकांची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा कृषी विभागामार्फत जागर करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जावून मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रसंगी श्री देविदास मार्कंड यांनी अद्रक व स्वीटकॉर्ण यासारखी अपारंपारिक पिके घेवून व लॉक डाऊन काळात देखिल टरबूजाचे विक्रमी उत्पन्न घेतल्याबद्दल त्यांचा आमदारांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सभापती भाऊसाहेब हिरे, सदस्य सुभाष कुटे, सुमनताई निकम वेहेळगांव प्रमोद भाबड, शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, सागर हिरे, गट विकास अधिकारी श्री चौधरी, तालुका कृषी अधिकारी श्री पाटील, मंडळ कृषी अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.

परभणीत जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू; केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा – जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

nashik
Comments (0)
Add Comment