माजलगांव,प्रतिनिधी – कोरोना विषाणू च्या संसर्गजन्य महामारी वर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सार्वजनिक वाहतूकीवर बंदी घालण्यात आली आहे आणि यात सर्व सामान्य माणसाच्या प्रवासात लाईफ लाईन असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस (लालपरी) चा प्रमुख समावेश करण्यात आला असल्याने याचा परिणाम म्हणून माजलगांव आगारातील बसेस च्या उत्पन्नात झाला असुन मार्च ते जुलै महिन्यात जिल्हा अंतर्गत रस्त्यावर ४९हजार ७००कि.मी.चा प्रवास आणि २५० फेऱ्यांतून केवळ १३ लाख रुपयांचे उत्पन्न (अर्निंग) मिळाल्या ची माहिती आगार प्रमुख दत्तात्रय काळम पाटील यांनी दिली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, माजलगांव आगारात एकुण ५५बसेस आहेत आणि त्यात १५ लांब पल्ल्याच्या आहेत. यासाठी १२६चालक ,१२५वाहक नौकरी करतात तसेच इतर कर्मचारी ,अधिकारी वर्ग सर्व मिळून ३०५ जणांचा स्टाफ कार्यरत आहे .यासर्वांचे मासिक वेतन ४५लाख रुपये आहे.
प्रवासी वाहतूक काही अटिवर जिल्हा अंतर्गत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली तसेच बाहेर च्या जिल्ह्यात मालवाहतूक करण्यासाठी बसेस मध्ये बदल करून मालवाहतूक बसेस करण्यात आल्या आहेत तरीही प्रवासी व व्यापाऱ्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने सध्याच्या परिस्थितीत रापमची बस वाहतूक व्यवस्था तोट्यात असल्याने मार्च ते १३जुलै पर्यंत ७कोटी, ५० लाख रुपयांचे उत्पन्न बुडाल्याने आगारातील सर्वच कर्मचाऱ्यांना माहे जुनचे वेतन देण्यात आले नाही हे वास्तव समोर आले आहे.
गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});