उद्या बारावीचा निकाल, कुठे व कसा पाहाल निकाल?

उद्या बारावीचा राज्य बोर्डाचा निकाल (maharashtra state board result) जाहीर होणार आहे. उद्या दुपारी १ वाजता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालाकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं लक्ष लागून होतं. ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. अखेर राज्य मंडळाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी बारावीच्या निकालाबाबतचे सोमवारी पत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार मंगळवार २१ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करण्याची असल्यास अर्ज करता येणार आहे.

 

असा पहा निकाल (How to See HSC Result)
1) mahresult.nic.in
2) mahahsscboard.in
3) hsc.mahresults.org.in
4) hscresult.mkcl.org
5) results.gov.in.

या साईटवर जाऊन विद्यार्थी हे आपला बारावीचा निकाल आरामात पाहू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी परीक्षा क्रमांकाची आवश्यक आहे.

 

 

ऑनलाइन निकालानंतर बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने मिळवलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येणार आहे.

hsc result 2024hsc result websiteshsc results newsmaharashtra state board result 2024result 2024sscबारावीचा निकाल 2024
Comments (0)
Add Comment