जम्मूच्या अखनूरमध्ये गुरुवारी दुपारी यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस 150 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला. 69 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो.
जम्मू-पुंछ महामार्गावर हा अपघात झाला. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सुमारे 90 लोक बसमध्ये प्रवास करत होते. हाथरसहून शिव खोरीला जात होते. बचावकार्य सुरू आहे. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
केंद्र सरकारने मृतांच्या वारसांना 2-2 लाख देण्याची घोषणा केली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे.
ही बस भाविकांना घेऊन जम्मूवरून शिवखोरी देवदर्शनासाठी येथे जात होती. यादरम्यान अखनूरमधील तांडा परीसरात असताना अचानकपणे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस १५० फूट दरीत जाऊन कोसळली. या अपघात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना अखनूरमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जम्मूच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या बसमधील सर्व प्रवाशी उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील असून ही बस शिवखोरी येथे जात होती. या दरम्यान ही बस दरीत कोसळली. याठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आले असून जखमींना अखनूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
असाच अपघात सहा महिन्यांपूर्वी झाला होता
15 नोव्हेंबर 2023 रोजी जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील अस्सार भागात बस 300 फूट खोल दरीत कोसळली होती. या अपघातात 9 महिलांसह 38 जणांचा मृत्यू झाला. बस किश्तवाडहून जम्मूला जात होती. पोलीस आणि एसडीआरएफच्या पथकांसोबत स्थानिक लोकांनीही मदत आणि बचाव कार्य केले.
बसचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी ती कापावी लागली. जखमींना किश्तवार जिल्हा रुग्णालयात आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), डोडा येथे दाखल करण्यात आले. काही लोकांना एअरलिफ्ट करून जम्मूला नेण्यात आले.