पूर्णा / प्रतिनिधी – चर्मकार समाज बांधव व राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा पूर्णा तालुक्याच्या वतीने समाजाचे ता. २८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी ११ वा. समाजाचे आद्यगुरु श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६४८ व्या सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पूर्णा शहरातील ज्ञानेश्वर विद्यामंदिर गवळी गल्ली परिसर येथे जयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमास सत्कारमूर्ती म्हणून गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे, कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय चर्मकार महासंघ विदर्भ अध्यक्ष संभा वाघमारे, असणार आहेत स्वागत अध्यक्ष माधवराव गायकवाड, प्रदेशाध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुभाषराव सूर्यवंशी, प्रमुख वक्ते प्रा. विष्णू आसोरे, सहादू, ठोंबरे , उपाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, विनोद आसोरे पेडगाव, असणार आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. नगराध्यक्ष विशाल कदम, व संतोष एकलारे, मा. उपाध्यक्ष उत्तमभैया खंदारे, अनिल खर्गखराटे, दादाराव पंडित, नितीन उर्फ बंटी कदम, पूर्णेच्या सहा.पो.नि रेखा शहारे, शहरातील आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आदीं मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तरी जयंती सोहळ्याची सर्व जय्यत तयारी मा. वैजनाथ नारायणकर, मा. बबनराव अन्नपूर्ण,डॉ. नागनाथ जुंजारे, डॉ. चंद्रभान गंगासागरे, मा. लिंबाजी गायकवाड, मा. शंकर जोगदंड, मा. राजु नारायणकर मा. पुरभाजी असोरे, मा. प्रकाश कांबळे, मा. गोपाळ सोनटक्के, मा. डॉ. शुभम गंगासागरे मा. बालासाहेब जयकर, मा. शिवाजी सोनटक्के, मा मा. बालासाहेब जयकर, मा. शिवाजी सोनटक्के, मा.प्रकाश फुलवरे, कोंडीबा सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष अमोल गायकवाड, शंकरराव जोगदंड, लिंबाजीराव गायकवाड, प्रकाश कांबळे, बबनराव अन्नपूर्ण, पुरभाजी आसोरे, रामराव जोगदंड, हरी जोगदंड, हरी असोरे, बाबुराव कसारे विकास गायकवाड, अनिल नारायणकर, लक्ष्मण परसुते, दिपक जोनवाल, प्रकाश खरात, बालाजी असोरे, नामदेव पाटील, रमेश जोनवाल सह राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा व चर्मकार समाज बांधव मोठ्या उत्साहाने तयारी करत आहेत. तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवहान जयंती मंडळाचे अध्यक्ष सुशिल गायकवाड, कार्याध्यक्ष सुशिलकुमार दळवी यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे