माजलगांव, प्रतिनिधी – तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीचा गावातीलच युवकाने विनयभंग केला. तसेच तिच्या वडीलांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपीवर दिंद्रुड पोलीसात विनभंगासह अॅट्रासिटीचा सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.
दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील १६ वर्षीय मुलगी एकटीच तिच्या घरासमोर भांडे घासत होती. यावेळी नामदेव महादेव घायतिडक यांच्या सालगडयाचा मुलगा गणेश याने दि.२१ गुरुवारी तेथे येवून अंगावर चिठी टाकत हात धरत म्हणाला की , तू चिठ्ठी घे नसता मी बळजबरी करील असे म्हणला. पिडीतेने चिठ्ठीवरील नंबरवर फोन केला असता गणेश म्हणाला तु मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर नसता तुझ्या आई , वडील , भाऊ यांना मारुन टाकील असे धमकावले. पिडीता घाबरुन गेली . त्यानंतर रविवारी दि .२४ रोजी गणेश याने फोनवर पुन्हा पिडीतेस भेटण्याची मागणी केली . यावर घाबरुन जावून पीडितेने सर्व प्रकार वडीलाना सांगितला . यावर गणेश घरासमोरुन जात असताना पीडितेच्या वडीलाने त्यास मुलीस का ञास देत आहे , असे विचारले असता . त्याने त्रास देणारच आहे काय करायचे ते करा असे म्हणून निघून गेला . त्यावर पीडितेचे वडील नामदेव घायतिडक यांच्याकडे घडलेला प्रकार सांगावयास गेले . यावेळी नामदेव घायतिडक , महेश घायतिडक व गणेशचे वडील त्यांच्याच अंगावर धावून आले . जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली . यावरुन वरील चौघा विरुध्द दिंद्रुड पोलिस ठाण्यात सोमवारी विनयभंगासह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पोलिस उपअधीक्षक श्रीकांत डिसले करत आहेत .