निसर्ग चक्री वादळाने पेण खारेपाटला झोडपले, लाखो रुपयांचे नुकसान

विद्युत पुरवठा खंडित होऊन संपर्क तुटला, पोल, झाडे, घरांचे पत्रे पडुन मोठे नुकसान
पेण  : कोरोना विषाणूने थैमान घातले आसताना निसर्ग नावाच्या चक्रीवादळाचा तडाख्याने जिल्ह्यासह पेण खारेपाट भागात चक्रीवादळाने येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
नुकताच वेधशाळेने निसर्ग नावाच्या चक्रीवादळाचा इशारा दिला होता. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले होते. दुपारच्या सुमारास चक्रीवादळांची झळ जाणवू लागली काही वेळाने वादळान रुद्र रुप धारण करुन येथील वाशी, ओढांगी, कणे, वढाव, भाल, काळेश्री, घोडाबंदर तामशीबंदर तसेच परिसरातील गावांचे घरावरील पत्रे, कौले उडुन मोठे नुकसान झाले. आधीच मोडकळीस आलेले विद्युत पोल पडुन विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. वादळाची तिव्रता बघुन वाड्यवरील नागरिकांनाही गावांचा आसरा घेतला.
सदर वादळामुळे अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये अनेकांची कौलारू घरावरील छप्पर उडून गेले,  वादळामुळे शहरासह ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी विद्युत पोल पडले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडले आहेत. सुदैवाने या भयंकर वादळात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान मात्र झाले आहे. स्थानिक प्रशासनाने कालच वादळाची तीव्रता लक्षात घेऊन काल दुपारी 2 वाजल्यापासून संपूर्ण शहरातील ग्रामीण भागातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या होत्या , खारेपाट भागातील समुद्र किनारी आसलेल्या अनेकांना जे धोक्याच्या ठिकाणी आहेत त्यांना सार्वजनिक ठिकाणी स्थलांतरित केले होते आणि नागरिकांनी देखील प्रशासनाच्या दिलेल्या सूचनांचे पालन करीत घरात राहणे पसंत केले.
तबलिगी जमातच्या २५५० परदेशी सदस्यांना १० वर्षांसाठी भारत प्रवेशास बंदी, गृहमंत्रालयाची मोठी कारवाई
मद्यविक्रीमुळे राज्याच्या तिजोरीत भर घालण्यात पुण्याचा मोठा हातभार



Comments (0)
Add Comment