कन्नड,प्रतिनिधी – कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील मदर तेरेसा प्री.प्रायमरी इंग्लिश स्कूल, आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, साधना पाटील कनिष्ठ महाविद्यालय अंधानेर या शाळेने ऑनलाइन च्या माध्यमातून सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षातील विध्यार्थी शाळा प्रवेश तसेच ऑनलाइन अभ्यासक्रमास सुरुवात केली आहे.
संस्थापक अध्यक्ष मा.श्री.नबी पटेल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक आय.एन.पटेल, शिक्षक श्री.आर.के.अंभोरे श्री.एस.एल.मनगटे श्री.एस.एस.पांडव, श्री.ए.पी.पठाण, श्री.एस.ए.दाबके, श्री.ए.ए.पाटील, श्री.पी. व्ही.गोरे, श्री.मलिक शेख सर व इतर शिक्षक यांनी सोशल डिस्टन्ससिंग चे पालन करत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षकांनी दिलेला ऑनलाइन अभ्यास विध्यार्थ्यांनी ऑनलाइन कसा करावा.
तसेच पालकांनी तो अभ्यास जो पर्यंत शाळा चालू होतं नाही.तो पर्यत आपल्या पाल्याकडून मोबाईलवर कसा पूर्ण करून घ्यायचा यासंदर्भात शाळेच्या शिक्षकांनी पालकांच्या भेटी घेऊन आपल्या पाल्याच्या अभ्यासात कुठलाही खंड पडणार नाही. व कोरोना पासून आपण कोणकोणती काळजी घ्यावी.याबद्दल चे मार्गदर्शन व जाणीवजागृती शाळेच्या सर्व शिक्षकांनी पालकांपर्यंत जाऊन केली व महत्त्व पटवून दिले.
गोपीचंदगड संस्कृती, विज्ञान आणी राजकारणाचा अचुक संगम- ह भ प देवकर
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});