माजलगांव (प्रतिनिधी ):- दाल रोटी खाओ .. प्रभू के गुन गाओ … ह्या म्हणीप्रमाणे गोरगरिबांना जगण्यासाठी इतर सुविधा असो वा नसो व दाल , रोटी आवश्यक असते . परंतु केंद्र शासनाने घोषित केलेली प्रति राशन कार्डसाधी एक किलो दाळ दोन महिने उलटूनही गरिबांच्या ताटात अजून पर्यंत पोहोचली नसल्याने माईबाप सरकार दाय देता काय दाय !
असे उदगार गोरगरिबांचा मुखातून निघत आहेत.यांची दखल घेत दैनिक शब्दराजने यांची दखल घेत आवाज उटवल्याने आखेर गरिबाच्या ताटात दाळ पडली आहे .
कोरोनाचे भारतात आगमन होताच त्याचा प्रकोप वाढूलागला . खबरदारीच्या उपाययोजना म्हणून संपूर्ण भारतात २२ मार्च पासून ३० जुन पर्यंत विविध टप्प्यात लॉक डाऊन जाहीर करण्यात आले . आजच्या घडीला संपूर्ण देशात दोन लाख च्या वर नागरिकांना कोरोना ची लागण झाली आहे .
कोरोना या जागतिक महामारीमुळे कोट्यावधी लोकांच्या रोजगारावर गदा आली आहे . देशातील कोट्यावधी गोरगरीब जनतेवरउपासमारीची वेळ आलेली पाहून केंद्र सरकारने अत्यंत अल्प दरात नियमित मिळणाऱ्या राशन व्यतिरिक्ततीन महिन्यांसाठी अंत्योदय आणि प्राधान्य लाभधारक योजनेतील रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला प्रती राशन कार्ड एक किलो मोफत दाळ आणि प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ ही महत्त्वाकांक्षी योजना घोषित केली होती .
सदर योजना लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यातच घोषित करण्यात आली होती . त्या अनुषंगाने आतापर्यंत दोन महिन्यांचे मोफत तांदूळ अनेक अंत्योदय आणि प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना मिळाले . परंतु दोन महिने उलटूनही ह्या मोफत योजनेतील दाळ गोरगरिबांच्या ताटापर्यंत पोहचलीच नव्हती.
याविषय दैनिक शब्दराजने पत्राने या विषय केंद्राची दाळ अजुन गरिबाला मिळालीच नाही या मथळ्याखालीवृत्त प्रसिध्द केले होते यांची दखल आन्न पुरोठा मंडळानी घेत आज गरिबाच्या ताटात दाळ पडली आहे.कार्ड धारक नागरिकानी दैनिक शब्दराजचे आभार मानले आहे .
सागर जाधव “वीर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान” पुरस्काराने सन्मानित
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});