- महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संकटात
मालेगाव ,प्रतिनिधी – सेवाभावी ,निर्भिडपणे काम केलेल्या योद्यांना संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांनी मोहीम घेतला आहे.मालेगाव येथे सुनील बाबूलाल गायकवाड यांनी दाखविलेले धैर्य आणि कार्य हे गौरवास्पद आहे.
लाॅकङाऊन दरम्यान चे काम सर्व समाजाला प्रेरणा देणारे आहे व कौतुकास्पद व गौरवास्पद असल्याने महाराष्ट्र पुरोगामी संघाचे कोअर कमिटी उपाध्यक्ष प्रकाश चितळकर,व ज्ञानेश्वर बागुल यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन सुनीलआबा बाबूलाल गायकवाड (मालेगाव महानगरपालिकेचे भाजप गटनेता)यांना कोविङ यौध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.
संकटकाळी धावतो तोच खरा वाली, याचा प्रत्यय मालेगाव येथे सुनील गायकवाड यांच्या वतीने “मागेल /दिसेल त्याला मदत करत माणुसकी धर्म जागवत आहेत. लाॅकङाऊन झाल्यामुळे नागरिकांना अनंत अङचणी चा सामना करावा लागत असल्याने एकता मंङळा चे अध्यक्ष सुनील बाबूलाल गायकवाड, दिपक गायकवाड, दर्शन गायकवाड, टूनम गायकवाड,योगेश गायकवाड मदन गायकवाड देवा पाटिल यांच्या माध्यमातून कोरोनो यौध्दा म्हणून भूमिका पार पाडत आहेत.
कोरोनो या भयंकर आजाराने थैमान घातलेले असताना सुनील गायकवाड यांनी एकता मंडळाच्या सहकार्याने मालेगावात लाॅकङाऊन होतास,खबरदारी आणि कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी अप्रतिम काम करून दाखवले,यामुळे संपूर्ण गावक-यामधून कौतुक होत आहे.
संपूर्ण गावात सॅनिटायइजर फवारणी करून घेतली,अनेकांना उपासमारीची वेळ येवू नये म्हणून हजारो कुटुंबांना अन्नधान्याची किट वाटप केले.तसेच भाजीपाला घेण्यासाठी देखील नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून 110 टन भाजीपाला स्वखर्चाने हजारो कुटुंबांना घरपोच दिला.
तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ङाॅ.संदिप साभद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आर्सेलीक 30 या होमिओपॅथी शहरात,तालुका, गावपातळीवर वाटप करण्यात आले. तसेच भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करूण औषधे देण्यात आली.
कोरोनाच्या पाश्वभूभिवर अनेकांना अंतकरणाच्या सुनील गायकवाड यांनी सामाजिक बंधिलकीतुन मोठ्या प्रमाणावर मदत करत आहेत.सुनिल गायकवाड संकटकाळी पुढे येतात ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचे कार्य खरंच कौतुकास्पद आणिषे अभिमानास्पद आहे.आज सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
वडवणी येथील वकील बांधवांना किराणा किटचे वाटप
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});