महाराष्ट्रातील जातीय अत्याचार प्रकरणी वंचित आघाडी चे आंदोलन

माजलगांव ,प्रतिनिधी:- राज्यात मोठ्या प्रमाणात जातीय अत्याचार सध्या मोठ्या प्रमाणात जातीय अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आसल्याने या बाबत विविध मागण्या घेऊन राज्यभर वंचित बहुजन आघाडी आंदोलन करित आसतांना माजलगांव येथे ही आंदोलन करुन उपविभागिय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

राज्यातील ठाकरे सरकारच्या काळात जातीय अत्याचाराच्या घटना घडल्या असुन आनेक आनु.जातीच्या व्यक्तीचे जातीय भावनेतुन खुन करण्यात आले. ज्या ठिकाणी घटना घडल्या तेथील लोकप्रतिनिधी च्या हास्तक्षेपा मुळे मंञी ,पालकमंञी,स्थानीक आमदार निष्क्रिय येत आसुन राज्याच्या गृहमंञ्याचा कसलाच वचक राहिला नसल्यानेच नागपुरच्या बनसोडे हात्या प्रकारणातील आरोपींना गृहमंत्री वाचवत आसल्याचा आरोप आपल्या निवेदनात केला .

तर पुणे,अहमदनगर,बीड,नागपुर ,व महाराष्ट्रातील अत्याचार प्रवण भागात विशेष न्यायालये स्थापन करणे या सह विविध मागण्यासाठी माजलगांव उपविभागिय अधिकारी कार्यालया समोर सोसल डिस्टटिंग पाळत बहुजन वंचित आघाडीच्या वतीने आंदोलन करत उपविभागिय अधिकारी श्रीमती शोभा ठाकुर यांना निवेदन सादर केले.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासाचिव भिमराव दळे,जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे , धम्मानंद साळवे , अंकुश जाधव ,भारत तांगडे,विठ्ठल पंडित ,प्रशांत बोराडे,अजय साबळे ,लक्ष्मण जाधव , बाळासाहेब गायसमुद्रे,अशोक पौळ, मनोच चौरे, शञुघन कसबे,अतिष जाधव सह अन्य कार्यकर्ते या वेळी उपस्थिती होती.

हळद लागवड तंत्रज्ञान

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

beedबीडमाजलगांव
Comments (0)
Add Comment