ऐन शेतीच्या हंगामात विष प्राशन करून शेतकऱ्याने केली आत्महत्या

हिंगणघाट, दशरथ ढोकपांडे – ऐन शेतीच्या हंगामात विष प्राशन करून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने तालुक्यातील नांदगाव (कानगाव) येथे खळबळ माजली आहे.

नांदगाव येथिल अल्पभुधारक शेतकरी हेमंत भाऊराव घोड़े(४८) याने आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास आपले शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृतक शेतकरी हेमंत याचेकडे ३ एकर शेती आहे.लॉकडॉऊन तसेच शेतीच्या तोकडया उत्पन्नातून परीवाराची उपजीविका चालविने कठिन झाल्याने हेमंतवर कर्ज झाले असल्याने त्याने आत्महत्या केल्याची माहिती परीवाराकडून मिळाली. ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा पुढिल तपास अल्लिपुर पोलिस करीत आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019: पात्र लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय ; ‘अशा रीतीने होणार गुण निश्चिती’

नोकरी इच्छुक उमेदवारांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा



Comments (0)
Add Comment