पुणे, प्रतिनिधी – सद्यस्थितीत संपुर्ण महाराष्ट्र कोरोना सारख्या महाभयंकर राक्षसाच्या विळख्यात असताना महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनता खाजगी सावकारीच्या विळख्यात अडकलेली आहे. गेली ४ महिने लोकांना कामधंदा नाही , उद्योगधंदे बंद आहेत.लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.घर कसे चालवायचे , बँकेचे हफ्ते कसे भरायचे,त्यात भर म्हणून हा कोरोना सारखा महाभयंकर रोगाचे भूत लोकांच्या मानगुटीवर बसले आहे. सर्व सामान्य जनता एकवेळचे जेवण मिळेल का नाही या चिंतेत आहे. मुलांची शाळेची फी, घरखर्च , हॉस्पिटल खर्च,गाडीचे हफ्ते, घराचे हफ्ते कसे भागवायचे इत्यादी प्रश्न जनतेसमोर आ वासून उभे आहेत.शेतकरी पण या परिस्थितीला सामोरे जात आहे, शेतकरी पण कर्जबाजारी झाला आहे.
या कठीण परिस्थितीत शासनाने काहीच आर्थिक मदत केलेली नाही, बँकांकडे कर्ज मागायला गेले तर बँका हाकलून देतात,मग अश्या या परिस्थितीत लोकांना खाजगी सावकाराच्या दारात जावे लागते,हे खाजगी सावकार सर्व सामान्य जनतेला कोणताही परवाना नसताना मासिक २०ते ४० % व्याजदर घेतात,हेच व्याज वार्षिक पकडले तर तब्बल २५० ते ३००% इतके भरमसाठ व्याज आकारतात आणि या व्याजाच्या वसुलीसाठी हे गुंडाकरवी जनतेला त्रास देतात, शिवीगाळ करणे, धमकी देने, मारहाण करणे,जबरदस्तीने घर, जागा बळकावणे तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणे हे प्रकार खाजगी सावकार बिनधास्तपणे करतात,या सावकारांना कायदया ची काहीच भीती नसते, हे खाजगी सावकार कायदा यांच्या बापाच्या खिशात असल्यासारखे वागतात.
या खाजगी सावकारांच्या दहशतीमुळे अनेक लोकांना आत्महत्या करायला लागत आहे,तरी अश्या या खाजगी सावकारांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करून त्यांच्यावर मोक्का कायद्याच्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकार आणि पत्रकार समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री.दिपक कांबळे यांनी मा.मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे साहेब आणि गृहमंत्री मा.अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
वडवणीत बिडिओ – पदाधिकाऱ्यांत खडाजंगी, अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});