शब्दराज, ऑनलाईन टीम – देशात अनलॉक 1.0 दरम्यान कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे अनेक राज्यांत लॉकडाऊनचे नियम कडक करण्यास सुरूवात झाली आहे. कर्नाटकमध्येही कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने कर्नाटक राज्य सरकारने 5 जुलैपासून संपूर्ण राज्यात दर रविवारी कडकडीत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
कर्नाटकात रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाग्रस्तांची संख्या 12000 च्या जवळ गेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने 5 जुलैपासून फक्त दर रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत लॉकडाउन, तसेच 28 जूनपासून दररोज राञी 8 ते सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू व जमावबंदीची घोषणा केली आहे. याशिवाय सरकारी कामकाज सोमवार ते शुक्रवारच सुरू राहणार आहे.
कोरोना या विषाणुमुळे आरोग्य विषयक आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे तसेच कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जमावबंदीचा आदेश व रात्री 8 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. या कालावधीत फक्त जीवनाश्यक गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच नव्या नियमावलीनुसार रविवारी बस, रिक्षा, प्रवासी वाहतूक बंदच राहणार आहे.