चिमूर – आता पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना मुक्त असलेला तालुका म्हणून चर्चेत असणारा चिमूर तालुक्यात रविवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आलेला आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार चिमूर तालुक्यातील सोनेगाव वन येथील 35 वर्षीय युवक असून तो नागपुर येथून कऱ्हागृहातून पॅरोलवर आला असून चिमूर येथे त्याला 1 जुलैला कोरोटाईन करण्यात आले होते तर रविवारी त्याचा रिपोर्ट पोसिटीव्ह आला आहे त्यामुळे आतापर्यंत कोरोना मुक्त असलेला चिमूर तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आहे.
चिमुर शहर तीन दिवस लॉकडाऊन
चिमूर तालुक्यात एक कोरोना बाधित आढळून आल्यामुळे चिमूर शहर व परिसर 6जुलै ते 8 जुलै 2020 पर्यंत कडकडीत बंद राहणार आहे, मेडिकल व दवाखाने सुरू राहतील.या व्यतिरिक्त अन्य दुकाने बंद राहणार असून नागरिकांनी अत्यन्त महत्त्वाचे कामाशिवाय घराबाहेर पडू नये,असे आवाहन चिमूर नगर परिषद ने केले आहे. नियम व कायद्याचे पालन न केल्यास कायद्याच्या विविध कलमाद्वारे कठोर कारवाई करण्यात येईल, असे सूचित केले आहे.
खडसंगीही तीन दिवस लॉकडाऊन
खडसंगी पासून चार किमी अंतरावर असलेल्या नागपूर येथून आलेला सोनेगावं येथील युवक कोरोना पोसिटीव्ह निघाल्याने तथा खडसंगी हे गाव परिसरातील सोनेगावं, रेंगाबोडी, केसळबोडी, भांसुली,वाहांगाव आदी गावाची बाजारपेठ असल्याने अनेक नागरिक खडसंगी येथे खरेदीसाठी येतात त्यामुळे खबरदारी म्हणून खडसंगी येथिल ग्रामपंचायत व नागरिकांनी खडसंगी येथीलही दुकान बंद ठेवले आहेत.
त्या ऑटो चालकाने भरवली खडसंगीकरात धडकी
मूळचा चिमूर तालुक्यातील सोनेगावं (वन) येथील रहिवासी असलेला युवक नागपूर येथील कारागृहात एका गुन्ह्यात शिक्षा भोगत होता मात्र त्याची शिक्षा संपल्याने तो 1 जुलै ला चिमुरला आला असता तिथे आरोग्य विभागाने त्याला संस्थात्मक कोरोटाईन केले या युवकाचे स्वब रिपोर्ट रविवारी पोसिटीव्ह आले त्यामुळे चिमूर तालुका आज पर्यत कोरोना मुक्त होता मात्र या युवकांमुळे चिमूर तालुक्यात एक कोरोना पोसिटीव्ह रुग्णाची नोंद झाली आहे.
दरम्यान सोनेगावं येथील त्या कोरोना रुग्णाचे आई, वडील सोनेगावं येथील ऑटो वॉलयासोबत चिमूर येथे भेटण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या आई,वडील व ऑटो चालकाचा संपर्क त्या रुग्णासोबत आल्याची श्यक्यत वर्तवली जात आहे. त्यामुळे सोनेगावं, खडसंगी येथील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर ऑटो चालक सोमवरला खडसंगी मध्ये येऊन काही मित्राकडे एकच प्यालाची भूक भागविण्यासाठी गेल्याने खडसंगी येथील बऱ्याच नागरिकासोबत संपर्क आल्याने खडसंगी येथील गावकऱ्यांनी त्या ऑटो चालकाला गावात फिरण्यास मज्जाव करीत सोनेगावं ला पाठविले मात्र या ऑटो चालकाने खडसंगी येथील नागरिकांत धडकी भरवली हे तेवढेच खरे..
वर्षभर लढावे लागणार कोरोनासोबत, नियमावली लागू
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});