इतर जिल्ह्यात एस.टी. कर्मचार्यांना वेतन मिळाले मग वर्धा जिल्हातील कर्मचार्यांना का नाही?….अतुल वांदिले
हिंगणघाट ,प्रतिनिधी – मनसे जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले’ यांचा नेतृत्वात एस.टी.आगार व्यवस्थापक नेवारे यांना एस. टी. कर्मचाऱ्यांचा थकीत असलेल्या दोन महिन्याचे वेतन द्या आणि त्यांना तात्काळ कामावर रुजू करा यासाठी निवेदन देण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले त्यात वर्धा जिल्हातील हिंगणघाट आगारातील एस.टी.कर्मचाऱ्यांचा दोन महिन्याचे वेतन थकीत आहे आधीच कोरोनामुळे जनतेचे हाल होत आहे लोकांचा रोजगार गेला, नागरिकांचा हाताला काम नाही अशातच एस.टी. कर्मचारी वेतनपासून वंचित आज त्यांच्यावर व त्यांचा कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यात त्यांना कामापासून वंचित ठेवले आहे अजूनही कामावर रजू केले नाही.
केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनच्या काळात घोषणा केली की कोणीही कर्मचाऱ्यांचा वेतन कापणार नाही व नौकरी वरून कोणालाही बडतर्फ करणार नाही. परंतु सरकारच्या आदेशाला डावलून शासनाने कर्मचाऱ्याचे २ महिन्याचे वेतन थकविले एस.टी. आगाराचे वर्धा विभाग वगळता नागपूर, चंद्रपूर, भंडारा या विभागात सर्व एस.टी. कर्मचाराचे वेतन पूर्णपणे मिळाले मग आमच्या वर्धा जिल्हातील एस. टी. कर्मचार्यांनवर अन्याय का? जर असाच अन्याय कर्मचाऱ्यांवर होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.
यावेळी उपस्थित मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हासचिव सुनील भुते, वा.सेना जिल्हासंघटक, रमेश घंगारे, राजू सिन्हा, अजय पर्बत, किशोर भजभुजे,प्रशांत एकोणकर, अमोल तपासे, विजय राऊत,रुपेश चंदनखेडे,विजू कुकडे, बच्चू कलोडे, अमोल मुडे, नरेश चिरकुटे आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया :- वर्धा विभागात हिंगणघाट आगारातील एस.टी. कर्मचाऱ्यांचा मे-जून अशा दोन महिन्याचा पगार तात्काळ द्या व त्यांना ताबडतोब कामावर रजू करा कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय मनसे अजिबात सहन करणार नाही लॉकडाऊन मुळे त्यांच्यावर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यातच तुम्ही चक्क दोन महिन्याचे वेतन दिले नाही अस अजिबात चालणार नाही मनसे कदापि सहन करणार नाही थकीत असलेले २ महिन्याचे वेतन ताबडतोब देऊन त्यांना कामावर रजू करा.
अतुल वांदिले जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
‘या’ दिवशी लागणार बारावीचा निकाल
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});