पुरंदर,प्रतिनिधी : पुरंदर तालुक्यात सध्या करोनाच्या परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन असून याही स्थितीत बँकांचे व्यवहार सुरूच आहेत .योग्य ती खबरदारी घेऊन सोशल डिटन्सचे पालन करत व्यवहार होत आहेत. (सोमवार दि २०) किसानदिनाचे औचित्य साधत पुरंदरच्या पूर्व भागातील बँक ऑफ इंडियाच्या पिसर्वे शाखेत विविध यॊजनांतर्गत सुमारे साडे अकरा लाखांचे कर्ज वितरित करून वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्यात आला .
पीक कर्जे ,सोने तारण कर्ज , महिला बचत गटांना अर्थ साहाय्य आदी योजनांचा यात समावेश होता .काही निवडक कर्जदारांना कोरोना विषयक योग्य ती खबरदारी घेत कर्ज मंजुरी पत्र वाटप करण्यात आली .यावेळी पिसर्वे शाखेचे अधिकारी प्रवीण शितोळे . सहाय्यक हेमंत ताकवले , लियाकत शेख ,दिलीप गीते यांसह बँकेचे बापू बबनराव कोलते , दत्ता मेमाणे आदी ग्राहक यावेळी उपस्थित होते दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणारा किसानदिन यावर्षी साजरा करता आला नाही.
परळी शहरात होमगार्ड ते पोलीस कर्मचारी यांना सर्वांना अल्प आहाराची सेवा