मध्यरात्री पालोद येथे शेतकऱ्यांनी विकास दुधाच्या गाड्या अडवून पाठवल्या परत
सिल्लोड,प्रतिनिधी – दुधाचा दर हा पाण्याच्या बाटली पेक्षा कमी झाल्याने दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे दुधाला पाच रूपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी सिल्लोडमध्ये आज (ता.21 जुलै 2020 ) चक्क महादेवाच्या पिंडीवर दूध ओतुन अभिषेक करत आंदोलन केले. स्वतः ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष मारोती वराडे, तालुकाध्यक्ष सुनील सनान्से सह कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी दुधाने अभिषेक करून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. ‘स्वाभिमानी’चे संस्थापक अध्यक्ष मा.राजू शेट्टी यांनी आज राज्यभर दूधबंद आंदोलनाची हाक दिली आहे.
यावेळी गायीच्या दुधासाठी पुढील 3 महिन्यांसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर 5 रुपये अनुदान जमा करावे. केंद्र सरकारने 23 जूनला 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा. केंद्र सरकारने 30 हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा व निर्यात अनुदान प्रतिकिलो 30 रुपये देण्यात यावे व दूध पावडर,तूप बटर व इतर दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करावा.या मागण्या करण्यात आल्या.
कार्यकर्त्यांनी हातात दुधाच्या कॅन घेउन रस्त्यावर उतरून प्रचंड घोषणाबाजी केली. त्यानंतर चक्क दुधाने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत या अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तर दि. 20 रोजी मध्यरात्री काही शेतकऱ्यांनी स्वाभिमानीच्या आंदोलनात सहभागी होत जळगाव येथून औरंगाबाद येथे जाणाऱ्या विकास दुधाच्या गाड्या पालोद ता. सिल्लोड येथे अडवून परत पाठवल्या.
या आंदोलनात मारोती वराडे, सुनील सनान्से, युवराज वराडे, संतोष काकडे, गणेश काकडे, सोमिनाथ वराडे, रामेश्वर वराडे सह दूध उत्पादक शेतकरी व ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेशखिंड, पुणे व लांडोरखोरी, जळगाव यांना जैविक वारसा क्षेत्र घोषित करणार – वनमंत्री संजय राठोड