जिद्दीला यश : आई – वडिलांना कामात मदत करून केला अभ्यास
वडवणी , (प्रतिनिधी):- जिद्दीला परिश्रमाची जोड दिली की यश मिळतेच हे वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथील रेवती रंगनाथ बाबरे हिने दाखवून दिले आहे . तिची कर सहायक म्हणून निवड झाली आहे . आई वलिडांना शेतातील कामात मदत करून तिने अभ्यास केला होता . अखेर तिच्या परिश्रमाला यश मिळाल्याने सर्वस्तरातून स्वागत होत आहे .
रेवती सामान्य कुटूंबातील आहे . आई – वडील शेतकरी , त्यामुळे मोठ्या शहरात शिक्षण घेणे अवघड होते . प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर मागील काही वर्षांपूर्वी शुभांगी व रेवती या दोघी बहिणी औरंगाबादला अभ्यासासाठी गेल्या .सहायकाची पदवी मिळविली आहे . मंगळवारी याचा निकाल जाहीर झाला . यात तिने १२४ गुण मिळविले आहेत . जिद्दीने अभ्यास करून तिने आई – वडिलांच्या कष्टाला कर सहायक पदवी मिळवून फळ दिले .
“अनेकदा परीक्षा दिल्या . परंतु काही गुणांवरुन हुलकावणी मिळत होती . परंतु मी जिद्द सोडली नाही . याच जिद्दीला आज यश मिळाले आहे . माझ्या यशात माझ्या आई वडिलांसह संपूर्ण कुटूंब आणि गुरुजनांचा मोठा वाटा आहे . प्रामाणिक कर्तव्य बजावून जनसेवा करेल.
– रेवती बाबरे कर सहायक , खळवट लिमगांव.