पूर्णा,दि 13 ः
पूर्णा शहरासह तालुक्यात कृषी केंद्र चालक बी बियाणे खत विक्री चढ्या दराने विक्री करत असल्याने कृषी केंद्र चालकांवर सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने आज दिनांक 10 जून रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनात केली आहे पूर्णा तालुक्यात शेतकरी वर्ग खरीप पेरणीसाठी कृषी केंद्रावर खते बी- बियाणे मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत कृषी केंद्र चालकाकडून बी बियाणे खते चढ्या दराने विक्री करत असून कृत्रिम तुटवडा दाखवून सध्या बी बियाणे उपलब्ध नसून असे सांगून कृषी केंद्र चालक चढ्या दराने बी बियाणे खते विक्री करत आहेत शेतकऱ्यांना जीएसटी बिले न देता साध्या कागदावर बिली देत आहेत यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होऊन त्यांची फसवणूक होत आहे याकडे पूर्णा तालुका कृषी विभागने बी बियाणे खते कीटकनाशकाची चढा दराने होत असलेल्या कृषी केंद्रावर कठोर कारवाई करावी व तसेच तालुक्यातील सर्व कृषी केंद्रावर बी बियाणे खते उपलब्ध साठा यांचे नाम फलक बोर्ड लावण्यात यावे तसेच कृषी केंद्र चालकाची तपासणी व गुणवत्ता निरीक्षक कथा मार्फत सोयाबीन कापूस उडीद तुर मूग इत्यादी बीयाण्यांसह पिकांसाठी लागणारे सर्व रासायनिक खताचे नमुने घेऊन तपासणी करावी चढ्या दराने बी बियाणे खते विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई कारवाई करून त्यांचे कृषी केंद्राचे परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा पूर्णेच्या वतीने करण्यात आली आहे त्यावेळी तालुका अध्यक्ष जनार्दन आवरगंड शहराध्यक्ष सय्यद सलीम एम सुहागनकर शहर संघटक सुशिल गायकवाड. सचिव नारायण सोनटक्के.शहर उपाध्यक्ष किशोर सूर्यवंशी. महिला शहराध्यक्ष मथुरा गरड. भारती खंदारे सदस्य. सह ग्राहक पंचायत चे पदाधिकारी उपस्थित होते