आगीत भस्मसात झालेल्या घरांना आ.डॉ. राहुल पाटील यांची भेट

परभणी,दि 20 
शहरातील साखला प्लॉट भागात  शुक्रवार (दि.20) पहाटे पाच घरांना भीषण आग लागून ही घरे आगीच्या भक्षस्थानी सापडली आहेत. ज्यामध्ये रहिवाशांचे प्रचंड नुकसान झाले असून, या नुकसानीची आमदार डॉ. राहुल पाटील यांनी तात्काळ संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेसह जाऊन पाहणी केली. त्यांची आस्तेवाईकपणे विचारपूस करून त्यांना त्वरित मदत पुरवण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले. तसेच स्वतः देखील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी प्रयन्त करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सर्वसामान्य रहिवासी असलेल्या साखला प्लॉट परिसरातील ज्ञानेश्वर नगर भागात पहाटे 5 घरे जळून भस्मसात झाली. याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी या दुर्घटनेत सदर रहिवाशांचे संसार उपयोगी साहित्य आणि संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे. ज्यामुळे ही कुटुंबे अक्षरशः उघड्यावर आली आहेत. त्या घराची पाहणी परभणीचे आमदार डॉ राहुल पाटील तसेच तहसीलदार संदीप राजपुरे यांनी केली.
यावेळी आमदार डॉ. पाटील यांनी तहसीलदार, तलाठी तथा कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गीते यांना लवकरात लवकर पंचनामे करून आपत्ती निवारण निधीमधून मदत करण्यात यावी, अशा सूचना दिल्या.
यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे उपशहर प्रमुख संभानाथ काळे, किशोर रणेर, विभागप्रमुख अशोक गव्हाणे, केदार दुधारे, प्रल्हाद चव्हाण, अजय चव्हाण, राजेंद्र जोंधळे, यांच्यासह
अधिकारी कर्मचारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment