पूर्णा / सुशिलकुमार दळवी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारे मेरी माटी मेरा देश या नाविन्यपूर्ण उपक्रमातून देशातील ज्ञात अज्ञात सर्व शहीद हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी पूर्णा शहरांमध्ये अमृत कलश यात्रेचे रैली चे आयोजन करण्यात आले होते .
नगरपरिषद पूर्णा येथून नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी व जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सय्यद व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मा.जीवराज डापकर (प्रशासकन न. प पूर्णा),युवराज पौळ (मुख्याधिकारी नगरपरिषद पूर्णा), बोथिकर (तहसीलदार पूर्णा) .प्रदिप काकडे ( पुलिस निरीक्षक) सूर्यवंशी (गटशिक्षणाधिकारी पूर्णा )मयूर महाजन, दीपक पैठने नगरपरिषद मधील वसुली विभागातील सर्व कर्मचारी तसेच शमुकुंद मस्के (कार्यालयीन अधीक्षक) साहेबराव भूरके (विद्युत अभियंता), सिद्धार्थ गायकवाड़(संगणक अभियंता), किरण गुटे (अभियंता पाणीपुरवठा) सर्वच पूर्णा नगर परिषद कर्मचारी व नागरिक यानी उपस्थित होते यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अमृत कलश यात्रेचे पूजन करून यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेमध्ये शहरातील नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घेत या कलशात तांदूळ व माती टाकून देशाप्रती शहिदां प्रती असणारा आदरभाव व्यक्त केला.
पूर्णा येथे अमृत कलश पंचप्रण शपथ घेण्यात आली राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली व घरा घरा मधुन माती संकलित केली.