सेलू / नारायण पाटील – भगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त सेलू येथील श्री परशुराम जन्मोत्सव समिती व सर्व शाखीय व बहुभाषिक ब्राह्मण समाज बांधवांच्या वतीने भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शुक्रवारी, १० मेरोजी भव्य शोभा यात्रा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सेलू् येथील श्री गायत्री माता मंदिरात शुक्रवारी सकाळी सात वाजता भगवान श्री परशुराम यांना महाअभिषेक, सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रा, रात्री साडेआठ वाजता श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात महाआरती आहे. शोभायात्राचे प्रमुख आकर्षण भगवान श्री परशुराम यांची भव्य मूर्ती, भव्य परशुअस्त्र, श्री भगवान परशुराम यांची पालखी, श्री भगवान परशुराम यांचा सजीव देखावा, बाजीराव पेशवे व काशीबाई यांचा सजीव देखावा, ढोल व ताशा पथक, महिला भजनी मंडळांचा सहभागी होणार आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे, शोभायात्रा व विविध कार्यक्रमांमध्ये सर्व समाजबांधव पुरुष व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.