पूर्णा :- शहरात सकल हिंदू समाजाचे श्रध्दास्थान पाचशे वर्षा नंतर श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथील श्री राम मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठान सोहळ्याची निमित्त आज पुर्णा शहरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिर आनंद नगर पूर्णा येथे एक सकाळी नऊ वाजता राम मंदिर निर्माणसाठी बलिदान देणाऱ्या 30 कारसेवकांचा भव्य सन्मान करून व यांच्यात हस्ते मारुतीरायाची महाआरती करून शोभायात्रा ची सुरुवात करण्यात आली.
या शोभयात्रेत ढोल पथक, प्रभु श्रीराम मूर्ती ,भजनी मंडळ, हजारो तरुणी व महिला यांची लक्षनीय उपस्थित होते त्याचबरोबर, महंत योगी आदित्यनाथ, बागेश्वर बाबा , महाकाल भोले की बारात ,वानर सेना ,पाच फूट हनुमानाची मूर्ती दहा फूट प्रभू श्रीराम यांची मूर्ती,श्री राम लक्ष्मण सीता यांच्या सजीव देखव्यासह सहा ते सात हजार हिंदू समाज बांधव आज रस्त्यावर होता ही भव्य शोभायात्रा शहरातील अंबिका ,आनंद नगर चौक एसबीआय कॉर्नर ,बसवेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोनार गल्ली, महादेव मंदिर ,अंबा पाठी चौक व गुरु बुद्धी स्वामी ,मठ दत्त मंदिर गवळी गल्ली ते श्रीराम मंदिर या मार्गाने मिरवणूक काढण्यात मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी सडा टाकून रांगोळ्या टाकल्या व कलश मिरवणुकीचे स्वागत केले
या कलश मिरवणुकीत प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे सह फुलांनी सजवलेल् श्रीरामाचा गजर करीत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूक भगवे झेंडे मोठ्या उत्साहाने राम नामाचा जयघोष करीत निघाले मिरवणुकीत महिलांनी मोठ्या संख्येने मिरवणूक सहभागी झाल्या होत्या श्री प्रभू राम लक्ष्मण सीता देखावासह तसेच टाळ आणि मृदंगाच्या तालावर वारकरी संप्रदायातील छोटे वारकऱ्यांनी ही लक्ष वेधले होते या शोभायात्रेत प्रभू श्री राम नामाच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले भव्य शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन श्रीराम जन्मोत्सव समिती पूर्णा करण्यात आले होते