सेलू / नारायण पाटील – दि २१/२/२४ रोजी मोंढा भागातील एका दुकानासमोर सकाळी १० च्या सुमारास एक जिवंत काडतुस सापडले असून यामुळे शहरात चांगलीच खळबळ माजली आहे .
या बाबत सविस्तर वृत्त असे की ,शहरातील मोंढा भागात सतीश श्रीकिशनजी करवा यांचे खत ,औषधी व बियाणे विक्रीचे दुकान आहे .दि २१ रोजी करवा हे नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता आपले दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांच्या दुकानासमोरील ओट्यावर हे काडतुस त्यांना दिसून आले .त्यांनी त्वरित याबाबत सेलू पोलीस स्टेशन ला कळवले .व त्यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम३,२५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे .सपोनि संजय चव्हाण पुढील तपास करीत आहेत .
अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे ,पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील ओव्हळ ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची सूत्रे हलवली आहेत .