: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारने ६ डिसेंबर हा दिवस स्थानिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे. या दिवशी राज्य सरकारच्या अखत्यारीतील कार्यालयं, संस्था आणि शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हे आदेश मुंबई आणि मुंबई उपनगरातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू आहेत.
डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी दादर, मुंबई येथील चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी जमतात. महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी ४ ते ७ डिसेंबरपर्यंत विशेष बस प्रवासाची योजना करण्यात आली आहे. त्याशिवाय दादर रेल्वे स्थानकापासून ते चैत्यभूमीपर्यंत १५ ते २० मिनिटांच्या अंतरावर बस सेवा देण्यात येणार आहे.
४ ते ७ डिसेंबरपर्यंत विशेष बस सुविधा